ज्वाला तरी ते वरती उफाळे"
पेटती मशाल उलटी केली तरी तिच्या ज्वाळा मात्र वरतीच येतात. तसे सज्जन आपला मार्ग सोडत नाहीत अशाअर्थाचा हा श्लोक आज मला आठवला तो नोटाबंदी आणि मोदी यांच्यावरून. आणखी एक आठवड्यामध्ये नोटाबंदीची मुदत संपेल. भारतीयांच्या या ५० दिवसांच्या सामुहिक प्रवासावर अजूनकोट्यवधी शब्द लिहिले जायचे आहेत. २६ मे २०१४ रोजी सत्ताग्रहण केल्यानंतर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीतपरदेशी बॅंकेत पडलेल्या काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार समिती नेमायचा निर्णयघेण्यात आला होता. (हा आदेश त्या आधीचे कित्येक महिने यूपीए सरकारने धाब्यावर बसवला होता). तेव्हाच मोदीयांची या विषयामधली तळमळ पुढे आली होती. पण नोटाबंदीचा क्रांतिकारक निर्णय सरकार घेईल यावर कोणाचाचविश्वास नव्हता. काळ्या पैशावरच निवडणुका लढल्या जातात मग कोणता राजकीय पक्ष वा नेता स्वतःच्या पायावरधोंडा पाडून घेईल असे वाटत होते.
प्रामाणिक राहून मोदींनी निर्णय घेतला पण केवळ नेतृत्व प्रामाणिक असून चालत नाही. हजारो प्रामाणिकबॅंक कर्मचाऱ्यांनी आणि कोट्यवधी नागरिकांनी झळ सोसूनही नोटाबंदीचा कार्यक्रम भ्रष्ट बॅंक अधिकार्यांमुळेकार्यवाहीत म्हणावा तसा यशस्वी झाला नाही ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. दुसरा कोणी नेता असतातर एव्हाना या अपयशाने गडबडून गेला असता. ५०० च्या नोटा कमी पडल्या - २००० ची नोट काढलीच कशाला - ATM मध्ये नोटा का नाही आल्या - खरेच काळा पैसा बाहेर आला का वगैरे प्रश्नांचा भडिमार चालू असतानाही मोदीथंड डोक्याने विचार करून पुढची कारवाई ठरवत आहेत.
एकूण ६८ लाख खात्यांमध्ये मोठ्या रकमा भरल्या गेल्या असून हे खातेधारक टॅक्स भरत नाहीत असे दिसून आलेआहे. इतक्या लोकांची आता चौकशी करावी लागणार हे बघूनच छाती दडपायची एखाद्याची. इथून पुढे वैयक्तिक कररद्द झाला अथवा करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली गेली तर टॅक्स खात्यावरच्या कामाचा बोजा बऱ्याच प्रमाणातकमी होईल आणि हाच अतिरिक्त कर्मचारी वर्ग ह्या केसेसच्या मागे लावता येईल कदाचित.
मल तर वाटते की अशा प्रकारे टिंगल टवाळी होणार - काही प्रमाणात भ्रष्टाचार होणार हे सरकारने गृहितही धरलेअसावे. अडचणी येणारच आणि मी त्यावर मात करणार हाच मोदींचा ठाम निर्णय आहे. अशा दुर्दम्य इच्छाशक्तीवरच२००२ पासून आजपर्यंतची वाटचाल त्यांनी केली आहे. आपण प्रामाणिक असलो तर जनता आपल्या बरोबर राहील हात्यांचा राजकीय आशावादही खरा ठरला आहे. इतका मोठा गोंधळ होऊनही लोक त्यांच्यावर नाराज नाहीत इथेचआपल्या देशातील सामान्य नागरिकाची सदसद् विवेक बुद्धी किती शाबूत आहे ते दिसते.
नोटाबंदी कार्यक्रमाच्या पायऱ्या संपल्या नाहीत. किंबहुना आता सुरुवात झाली आहे. अजून पार्टीसिपेटरी नोटस् वरकारवाई व्हायची आहे. बेनामी मिळकतीवरील कायदा आताच मंजूर झाला आहे. सोने जवळ बाळगण्याची कमालमर्यादा कायदा तर १९९५ सालीच आला आहे पण त्यावरती कारवाई केली गेली नाही तीही व्हायची आहे. ही सगळीकामे एका फटक्यात होत नसतात. त्यामध्ये कित्येक वर्षे जातील.
पण जनतेला आशा आहे की हाचा आहे मार्ग ज्यातून आपली करण्यात आलेली लूट थांबवली जाईल. धसई गावकॅशलेस झाल्याचे दावे कसे फोल आहेत यावर वर्तमानपत्रांनी रकाने लिहिले पण त्यामधूनही सत्य लपले नाही कीइंटरनेट उप्लब्ध असेल तर जनता आर्थिक व्यवहार रोखीत करण्यापेक्षा नोटा न वापरता करण्यास उत्सुक आहे. हीचआशा आहे.
कितीही नव्या नोटा काढल्या तरीही त्यांची नक्कल होणारच म्हणून व्यवहारामध्ये मोठ्या नोटा नकोत हे अडाणीजनतेला कळते पण शहाण्यांना नाही. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ श्री गुरुमूर्ती म्हणतात एका मुंबई २६/११ च्या हल्ल्याची किंमतदेशाने ४०० कोटी रुपये एवढी भोगली आहे. म्हणून नोटा नकोत हेही जनतेला कळते. कितीही बुद्धीभेद करण्याचाप्रयत्न करा - तुमची विश्वासार्हताच शून्य आहे जनतेच्या लेखी.आपल्या परीने हे प्रयत्न मोदी सोडणार नाहीत यावरलोकांची श्रद्धा आहे. विश्वासार्हता हाच त्यांच्या यशस्वी राजकीय जीवनाचा भक्कम पाया आहे आणि तो गमावण्याइतके ते अजिबात भोळसट नाहीत.
No comments:
Post a Comment