Sunday, 19 February 2017

तिबेट ८

सोबत फोटो चिनी तत्ववेत्ता कनफ्यूशस



मी लेख लिहिल्यानंतरही अनेकांना चीनच्या धटिंगणपणाविषयी शंका असेल. त्यात काही वावगे नाही. म्हणून ह्या मुद्द्याबद्दल अधिक माहिती देणे उचित समजते. शिवाय त्यातून चीनच्या स्वत बद्दलच्या कल्पना कशा बेडकीसारख्या फुगल्या आहेत याचीही पुरेशी कल्पना येऊ शकेल.
इथे देत असलेला मजकूर खरा आहे किंवा नाही याची खात्री करून नंतर माझ्या मनातील शंका दूर झाल्यामुळे हा लेख लिहीत आहे. हा मजकूर वाचल्यावर माझी चिंता खरे तर वाढली आहे. त्याचे कारण तुम्हाला खालील तपशील पाहिल्यावर नक्कीच लक्षात येईल.
चर्रर हाओ ती आन (Chi Hao Tian) हे चीनच्या संरक्षण कमिशनचे उपप्रमुख म्हणून काम बघत होते. २००५ मध्ये त्यांनी चीनच्या उच्च लष्करी अधिकारी आणि जनरल्स याना उद्देशून केलेल्या ह्या भाषणाचा वृतांत बघा.
"कॉमरेड्स मी आज अत्यंत खुश आहे. sina .com ह्या वेब साईटने घेतलेल्या एका व्यापक सर्वे मध्ये चीनच्या तरुण पिढीकडून मिळालेला प्रतिसाद आपल्यासमोर आहे. आपली तरुण पिढी पक्षाचे कार्य भविष्यात उत्तमपणे पुढे नेईल.
ह्या सर्व्हेमध्ये एका प्रश्न विचारला गेला होता - तुम्ही स्त्रिया, मुले आणि युद्धकैद्यावर बंदूक चालवाल का? ह्या प्रश्नाला ८०% चिनी युवकांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. ही टक्केवारी आम्ही समजत होतो त्यापेक्षा बरीच मोठी आहे. असा सर्वे घ्यावा असे आम्हाला का वाटले ह्या विषयावर मी आज बोलणार आहे.
माझे आजचे भाषण नवे नाही. गेल्यावेळच्या भाषणाचा पुढचा भाग आहे. गेल्या भाषणामध्ये मी तैवान, द्यावू आणि स्प्राटली ह्या बेटांविषयी बोललो होतो. मी म्हटले होते की २० वर्षांचा शांतता आणि विकासाचा काळ आता संपुष्टात आला आहे. तलवारीच्या जोरावर आधुनिकीकरण हीआजची गरज आहे. चीनला आता आपल्या जागतिक हितसंबंधांकडे बघण्याची वेळ आली आहे.
स्त्रिया मुले आणि युद्धकैदी यांच्यावर गोळ्या चालवणार का असा प्रश्न सर्वे मध्ये विचारला असला तरी त्याचा मूळ रोख व्यापक आहे. मुख्य म्हणजे आमची नवी पिढी युद्ध ह्या विषयाकडे कोणत्या दृष्टीने बघते हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. निःशस्त्र इसमावर हत्यार चालवायला आमचे उद्याचे सैनिक तयार असले तर ते आक्रमकावर हत्यार नक्कीच चालवतील - त्याला ठार मारतील असा मला विश्वास आहे.
चीनच्या उज्ज्वल भविष्यासाठी शत्रूच्या प्रदेशात जर आम्हाला नरसंहार करावा लागला तर आमचे लोक त्यामागे उभे राहतील की त्याला विरोध करतील हे जाणून घेणे आम्हाला महत्वाचे वाटते. आमचा विकास म्हणजे चीन या राष्ट्राचे पुनरुज्जीवन - ह्या प्रयत्नांमध्ये जी भूमी आज आमच्या ताब्यात आहे केवळ तीच अभिप्रेत नसून सर्व जग त्यामध्ये मोडते.
पाश्चात्य म्हणतात की सर्व मानवजात आफ्रिकेमध्ये जन्माला आली. पण आमच्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की आमचे पूर्वज इथे याच भूमीत जन्मले. तेव्हा आमचा वंश वेगळा आहे. इतर वंश आमच्यापेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचा दावा करू शकत नाहीत. आमच्यामागे १० लाख वर्षांचा इतिहास आहे. आमची संस्कृती आणि प्रगती दहा हजार वर्षे जुनी आहे आणि आमचे राष्ट्र ५००० वर्षे पुरातन आहे. चिनी म्हणून आमची ओळख २००० वर्षे जुनी आहे. म्हणून आम्ही म्हणतो आम्ही यान आणि हुआंग चे वारसदार आहोत.
तांग राजवटीत आम्ही जगात सर्वश्रेष्ठ होतो. आम्हीच जगाच्या केंद्रस्थानी होतो. दुसरी कोणतीही संस्कृती आमच्याशी स्पर्धा करू शकत नव्हती. पुढच्या काळात आम्ही सुस्तावलो संकुचित वृत्तीचे झालो आपल्यापुरता विचार करू लागलो तेव्हा पाश्चात्य संस्कृतीने आपला पराभव केला. आणि जगाचे केंद्र पश्चिमेकडे गेले. आज आम्हाला पुन्हा हाच प्रश्न पडला आहे - आम्ही पुनश्च जगाच्या केंद्रस्थानी जाऊ शकतो का - १९८० मध्ये कॉमरेड लिऊ हुआ किंग म्हणाले होते की जगाचे केंद्र प्रथम पूर्वेकडून युरोपात - नंतर युरोपातून अमेरिकेत आणि आता पुनश्च पूर्वेकडे येऊ घातले आहे. म्हणून १९ वे शतक ब्रिटिशांचे होते. २० वे शतक अमेरिकनांचे तर २१ वे शतक चीनचे असेल. (प्रचंड टाळ्या)
आम्ही चिनी लोक जर्मनांपेक्षा हुशार आहोत. कारण आमचा वंश त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. शतकांचा इतिहास - मोठी लोकसंख्या आणि विशाल भूमी आम्हाला त्या वारशामधून मिळाली आहे. पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ असे दोन वारसे आमच्याकडे आहेत. एक म्हणजे निरीश्वर वाद आणि दुसरे म्हणजे हेवा वाटण्यासारखे ऐक्य. चिनी संस्कृतीचा संस्थापक कनफ्यूशस याने आम्हाला हा वारसा दिला आहे. आमचे अस्तित्व टिकवण्यासाठी कनफ्यूशसचा हा वारसा म्हणजे गुरुकिल्ली आहे. हा वारसा आहे म्हणूनच अगदी भीषण नैसर्गिक आपत्तीलाही आम्ही पुरून उरलो आहोत.
पुढे चालू .....


No comments:

Post a Comment