Thursday 28 February 2019

बालाकोटचे महत्व काय?


balakote

भारतीय वायुदलाने केलेल्या नेत्रदीपक चढाईनंतर त्यांना त्याचे श्रेय नाकारण्यासाठी उत्सुक असलेले लिब्बू पूंछजवळचे बालाकोट की मुझफ़्फ़राबादजवळचे बालाकोट ह्यावर काथ्याकूट करत बसली होती. मोदी करून करून काय करणार? नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देणे अशक्यच असे आडाखे वाजपेयी सरकारच्या अनुभवावरून बांधले जात होते. फार फार तर काय रेषेच्या आत दोन चार किलोमीटर्सच्या पलिकडे ह्यांची उडी पडणार नाही हेही डोक्यात पक्के होते. तेव्हा अख्खा पाकव्याप्त काश्मिर ओलांडून वायुदलाची विमाने खैबर पख्तुनवा पर्यंत पोचली आणि पाक वायुदलाकडून जराही प्रतिकार न होता ठरलेल्या जागी बॉम्ब टाकून सुखरूप परतली ह्या घटनेने लिब्बूंचे "देव" पाण्यात बुडाले होते. काल पाकिस्तानची १० हून जास्त एफ १६ विमाने आली आणि ह्या चौथ्या पिढीतील आधुनिक विमानांना यःकश्चित दुसर्‍या पिढीतील मिग २१ विमानाने हटकले आणि पळवून लावले म्हटल्यावर लिब्बूंची इज्जत पूर्णतया धुळीस मिळाली. ह्या प्रतिकारामध्ये शूर वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्तमान ह्याच्या मिग विमानाच्या इंजिनात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे ते पडले व अभिनंदनला त्यातून उडी मारून जीव वाचवावा लागला. वार्‍याच्या दिशेमुळे तो नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन पडल्यामुळे अलगद पाकड्यांच्या हाती गेला. पाकड्यांनी एक भारतीय वैमानिक जीवंत पकडल्यामुळे इज्जत धुळीला मिळालेल्या लिब्बूंच्या जीवात जीव आला आणि आता कशी पलटवतो बाजी बघा आम्ही म्हणून ते कोल्हेकुई करू लागले. अभिनंदनला सोडतो पण युद्ध वाढवू नका असा पवित्रा घेऊन इंटरनेटवरून जोरदार प्रचार सुरू झाला. No more War - De-escalate हॅशटॅगच्या गजरामध्ये भारतीय जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे सगळे कशासाठी? IC814 विमानाच्या  अपहरण प्रसंगी हे लिब्बू असेच वागले होते आणि त्यांनी केलेल्या प्रचारामुळे भारत सरकारवर दडपण येऊन खतरनाक दहशतवाद्यांना सोडून देण्याची नामुश्की वाजपेयी सरकारला सोसावी लागली हा इतिहास आणि त्यांचा पराक्रम लिब्बू विसरलेले नाहीत. याहीवेळी आपण असेच रान उठवू आणि मासूद अझरला संकटातून वाचवू अशी त्यांना आशा आहे. पण पाकिस्तानी आयएस आयच्या सुरक्षित घरट्यामध्ये बसलेल्या मासूदवर असे कोणते संकट आले आहे की ज्यातून त्याला वाचवण्यासाठी रान उठवले जात आहे?

काल म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी फ्रान्सने मासूद अझरला युनोने दहशतवादी म्हणून घोषित करावे असा प्रस्ताव नव्याने मांडला आहे. ह्या प्रस्तावावरती सहप्रस्तावक म्हणून अमेरिका आणि ब्रिटननेही सह्या केल्या आहेत. आजपर्यंत तीन वेळा ह्या प्रस्तावावरती व्हेटो वापरणारा चीन यावेळी मात्र प्रस्तावाला संमती देतो काय ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाच कायम सभासदांखेरीज अन्य १० सभासदांना भेटून त्यांचेही होकारार्थी मत मिळवण्यासाठी मोदी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. जर असा प्रस्ताव मंजूर झालाच तर त्यानुसार पाकिस्तानला मासूदवर कारवाई करावी लागेल अन्यथा संपूर्ण जगामध्ये त्याची छीथू अटळ होऊन जाईल. नेमक्या ह्याच संकटातून मासूदला नव्हे तर पाकिस्तानला वाचवण्यासाठी इथल्या लिब्बूंनी कमरा कसल्या आहेत. 

ह्या पार्श्वभूमीवरती भारताने हल्ला चढवण्यासाठी ज्या बालाकोटची निवड केली त्याचे महत्व काय आहे ह्याविषयी माध्यमे मूग गिळून बसली आहेत म्हणूनच हा विषय सविस्तर विशद करणे भाग पडत आहे. मासूद अझरचा जन्म बहावलपूरचा असला तरी त्याचे इस्लामी शिक्षण कराची जवळच्या बानुरी गावात झाले आहे. ह्याच बानुरी गावामधली बानुरी (बिनोरी) मशीद रॅडिकल इस्लामच्या प्रचारासाठी जगप्रसिद्ध असून एक काळ होता जेव्हा ९/११ च्या हल्ल्यानंतर खुद्द ओसामाने ह्या मशिदीमध्ये आश्रय घेतला होता असे सांगितले जाते. तर मासूद अझरने जेव्हा हरकत उल मुजहिदीन मधून बाहेर पडून स्वतःची जैश ए मोहमद ही स्वतंत्र संघटना काढायचे ठरवले तेव्हा त्याला बानुरी मशिदीचे मुफ्ती शमझई ह्यांनी पुरेपूर मदत केली आणि आय एस आय ने बालाकोट येथे एक पूर्णतः नवे कोरे प्रशिक्षण केंद्र उघडून दिले. बहावलपूरमध्ये जन्मलेल्या आणि कराची मधून काम करणार्‍या मासूदसाठी बालाकोटची निवड का करण्यात आली असावी ह्याची रंजक माहिती मिळते.

आज आपल्याला बालाकोट हे नाव वायुदलाने केलेल्या हल्ल्यामुळे माहिती झालेले असले तरीही हे नाव रॅडिकल इस्लामच्या अभ्यासकांना नवे नाही. सय्यद अहमद शहीद बरेलवी हे नाव ह्या वर्तुळामध्ये मोठे मानले जाते. त्यांचा जन्म १७८६ सालचा आणि उत्तर प्रदेशच्या "रायबरेली" मधला. मूळ सुन्नी कुटुंबातले हे लोक इस्लामच्या हनफी न्यायशाखेमधले होते. हा काळ होता दिल्लीमधील औरंगजेबाची सल्तनत ढासळण्याचा आणि काफिर मराठे आणि शिख ह्यांच्या उदयाचा. त्याच काळामध्ये इस्लामच्या पुनरुज्जीवनाचे आणि इस्लामी राजवट पुनश्च प्रस्थापित करण्याचे स्वप्न घेऊन सय्यद ह्यांनी आपले काम सुरू केले आणि वैयक्तिक मित्रत्वाच्या जोरावर साथीदारांचे एक जाळे तयार केले. फिरता फिरता ते पश्तून टोळ्यापर्यंत पोचले आणि  त्यांच्यामध्ये इस्लामच्या प्रचाराचे काम दृढ केले.  सय्यद ह्यांचे अनुयायी भारताच्या अनेक भागामध्ये दिसून येत व त्याकाळी त्यांचा प्रभाव काश्मिर व अफगाणिस्तानवरही पडला होता. १८२६ मध्ये ते पेशावर येथे पोचले आणि तेथील शिखांच्या राजवटीला आव्हान उभे करण्याचे काम त्यांनी सुरू केले. आज नॉर्थ वेस्ट फ्रॉंटीयर प्रॉव्हिन्स म्हणून जो भाग ओळखला जातो तिथे महाराजा रणजित सिंग ह्यांची सत्ता होती. कट्टर इस्लामच्या पायावरती त्यांनी ह्या सत्तेला आव्हान उभे केले. हे हिंदुस्तानच्या भूमीवरचे एक जिहादी युद्ध होते असे म्हणता येईल. १८३१ मध्ये मनशेरा जिल्ह्यातील बालाकोट येथे जी लढाई झाली त्यामध्ये सय्यद ह्यांनी शिख सैन्यासाठी मोठ्या शिताफीने सापळा रचला होता. त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशामधल्या शेतांमध्ये दलदल बनवली आणि ते शिख सैन्याची वाट बघू लागले.  पण शिखांचा सेनापती शेरसिंगही चतुर होता. त्याने वाट पाहण्याचे ठरवले. नंतर सय्यदच्या एका अनुयायाला राहवले नाही आणि तो प्रथम त्याच शेतांमध्ये घुसला. त्याच्यामागून सैन्यही घुसले. दलदलीमध्ये ते फसले आहेत से बघून शेर सिंगाने त्यांना वेढा घातला. एकूण १३०० मुस्लिम मारले गेले.  शिख सैन्याकडून शिरच्छेद होऊन सय्यद मारले गेले - शहीद झाले. याच लढाईमध्ये आणखी एक महत्वाची व्यक्ती मारली गेली. शिखांचे पाचवे गुरू अर्जुन सिंग ह्यांना ठार मारणार्‍या शेख सिरहिंदी ह्यांच्या कुटुंबातील शाह इस्माईल सईद देखील तेव्हा बालाकोटमध्ये इस्लामी सैन्यामध्ये शिखांच्या विरोधात लढत होते. अशा तर्‍हेचे अनन्यसाधारण अहत्व असलेल्या बालाकोट मध्ये मासूद अझर आला आणि त्याने तिला आपली कर्मभूमी मानली कारण मासूद अझर सय्यद अहमद बरेलवी ह्यांना आपला हिरो मानतो. धर्माच्या आधारावर लढण्यात आलेल्या ह्या लढाईला त्याच्या दृष्टीने फार मोठे महत्व आहे. म्हणून बालाकोट गावाला रॅडिकल इस्लामींच्या दुनियेमध्येही एक वेगळेच स्थान आहे. 

पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जेव्हा जैश ए मुहमद संघटनेने स्वीकारली त्यानंतर पाकिस्तानचे माजी सरसेनापती आणि पुढे अध्यक्षपद भूषवलेले परवेझ मुशर्रफ ह्यांची खास मुलाखत टीव्हीवरती तुम्ही बघितली असेल. मुशर्रफ ह्यांच्या जीवनामध्ये जैश संघटनेचे एक महत्व आहे. सुप्रसिद्ध ज्यू पत्रकार डॅनियल पर्ल ह्यांचे कराची येथून अपहरण करून हत्या करण्यात आली त्या गुन्ह्याबाबत पाकिस्तानाध्ये जैशवरती ठपका ठेवण्यात आला होता. इतकेच नव्हे तर ह्याच जैशने आपल्याला ह्या खटल्यामध्ये गुंतवले ह्या रागाने मुशर्रफ ह्यांच्याच हत्येचा कट रचला होता. ह्यापैकी एका कटाची माहिती मुशर्रफ ह्यांना आश्चर्यकारकरीत्या वाजपेयी सरकारकडून देण्यात आली.   अशा प्रकारे आपला जीव वाचवणार्‍या अटलजींबाबत मुशर्रफ कसे हळवे होतात ते आपण बघितले असेलच. 

असो. तर मासूद अझरच्या पापांचा घडा लिहायचा तर बरेच काही लिहावे लागेल. इतके असूनही त्याची पाठराखण करणारे आजही पाकिस्तानात अनेक जण आहेत आणि ते सत्तवर्तुळामध्ये उजळपणे वावरतात हे ढळढलीत सत्य आहे. खेदाची गोष्ट अशी की पर्ल ह्या अमेरिकन पत्रकाराच्या हत्येबाबत अमेरिका किती संवेदनशील आहे असा प्रश्न पडण्याइतकी अमेरिका ह्या प्रकरणी अलिप्त असल्याचे दिसत नाही काय? म्हणूनच भावना बाजूला टाकून प्रत्येक व्यवहारामध्ये स्वतंत्र तत्वे "शोधून" काढणार्‍या अमेरिकनांना अफगाणीस्तानसारख्या देशाची नस कधीच समजली नाही असे दिसते आणी त्यांच्यावर अग्निवर्षाव करणार्‍या तालिबानांच्या हाती अफगाणिस्तानची सत्त द्यायला ही विद्वान मंडळी उतावळी झाल्याचे बघितले की मन साहजिकच विषण्ण होते. आज आपण जी लढाई छेडली आहे ती पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर एव्हढ्याच मर्यादित स्वरूपात बघणार असलो तर आपलाही पराभव ठरलेला आहे म्हणॊओन समजा. पाकिस्तानातील जिहादींचा प्रश्न हा ह्या भूभागातील स्थैर्याशी आणि सुरक्षेशी जोडला गेला आहे आणि त्यावर सर्वंकष विचार करूनच तोडगा काढता ये ईल भले प्रत्यक्षात् परिणाम दिसायला वेळ लागला तरी चालेल पण मूळ दिशा मात्र आपण विसरता नये असे मला खात्रीने वाटते. हेच महत्व आहे बालाकोटवरील चढाईचे. जय हिंद.

8 comments:

  1. शेखर प्रधान28 February 2019 at 18:56

    सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख
    दोन दिवसांपूर्वी निशांत वर्मा नावाचा काँग्रेसी उंदीर टाइम्स नाऊ चॅनेल वर कुठले बालकोट म्हणून खूप चेष्टा करत होता
    त्याला हे सणसणीत उत्तर आहे
    हे सगळेच काँगेससी एवढे हरामखोर कसे असतात?
    एकमध्येही सरकारचे अभिनंदन करायची दिलदारी नाही आणि देशभक्ती तर अजिबात नाहिच
    आशा आहे सुशिक्षित तरी हे बघत असतील
    पप्पू महाराज तर गायबच झालेत

    ReplyDelete
    Replies
    1. कॉग्रेस स्वतःच इतिहास विसरला आहे!

      Delete
  2. दिदिला ह्याचे भाषान्तर करुन पाठवले पाहिजे.

    ReplyDelete
  3. माहत्वापुर्ण माहीती मिळाली

    ReplyDelete