सोबत चित्र चर्रर हाओ तिआन
आजवर अमेरिकेच्या भूमीवर कोणी आक्रमण केले नाही म्हणून ती महासत्ता आहे. ज्यादिवशी आम्ही असा हल्ला चढवू त्यादिवशी आम्ही ती भूमी जिंकू कारण त्यांच्या वॉशिंग्टन डी सी मध्ये हाऊस मध्ये आधी चर्चा होणार मग अमेरिकन अध्यक्षाला हल्ला करण्याची परवानगी मिळणार- त्याच्या आत आम्ही त्यांच्या राजधानीत पोचलेले असू.
असल्या क्षुल्लक गोष्टींमध्ये आम्ही वेळ व्यर्थ घालवत नाही. आम्ही निरीश्वरवादाचा अधिक जोमाने पुरस्कार करतो. कारण पाश्चिमात्यांप्रमाणे चिनी लोक देवाचे ऐकू लागले तर आमचे ऐकणार कोण? इथली सामान्य माणसे जर हू जीन ताओ वर प्रश्न विचारू लागली - त्याच्या अधिकारावर शंका घेऊ लागली आणि हू जीन ताओला आम्ही नियंत्रित करू असे म्हणू लागली तर आमचा पक्ष चीनवर राज्य करू शकेल?
चिनी वंशाला आज भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जगण्यासाठी अपुरी जागा. (Lebens Raum). जगण्याच्या साधनांवरून जगामधली अनेक युद्धे छेडली गेली आहेत. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीकडे होती त्यापेक्षा कितीतरी कमी दर डोई साधन संपत्ती आमच्या गाठीशी आज आहे. त्यात भर म्हणून गेल्या वीस वर्षात भरमसाठ औद्योगिकीकरण झाले आहे. जगाचे हवामान बदलत आहे. आमचे पर्यावरण प्रदूषित आहे. आमचा विकास तर सोडाच पण आमच्या अस्तित्वालाच आज अपुऱ्या साधना संपत्तीमुळे धोका निर्माण झाला आहे.
तुम्ही पश्चिमेकडे गेला असाल तर तुम्हाला माहित असेल की त्यांच्याकडे विशाल भूमी आहे. हायवेच्या कडेने तिथे जंगले आहेत. तिथल्या निळ्या आभाळात एखादा पांढरा ढग दिसतो. आमचे आकाश धुराने काळवंडले आहे. त्यांच्याकडे साधे नळाचे पाणीदेखील पिण्यालायक आहे. आमच्याकडे जमिनीतले पाणी देखील प्रदूषित आहे आणि गाळल्याशिवाय पिता येत नाही. तिथे रस्त्यामध्ये माणसे तुरळक दिसतात. एखाद दुसरा माणूस अख्ख्या इमारतीत एकटाच राहतो. त्याउलट आमचे रस्ते माणसांनी ओसंडलेले आहेत आणि एकेका खोलीत अनेक जण कोंबून राहत आहेत. आमची जीवन पद्धती अमेरिकन झाली आहे त्यामुळे आम्ही अधिक साधन संपत्ती वापरू लागलो आहोत. पण आमची लोकसंख्या १३० कोटीच्या वर गेली तर हा समाज कोसळून पडेल असे भविष्य Yellow Catastrophes मध्ये वर्तवण्यात आले होते. आज आम्ही ती संख्या ओलांडली आहे. काही गोष्टी आयात करून आम्ही वेळ निभावून नेत आहोत.
Lebens Raum हा शब्द वापरण्याचे आम्ही टाळत आहोत कारण तसे केले तर पाश्चात्य लोक आमची तुलना नाझींशी - हिटलरशी करू लागतील. म्हणून आमचे म्हणणे मांडताना आम्ही 'Human Rights are just living rights' असे म्हणतो आणि 'living space' असे म्हणायचे टाळतो. पाश्चात्यांनी आमच्या आधी वसाहती निर्माण करून आपला प्रश्न सोडवला. चिनी लोकांनी चीन बाहेर आपल्या वसाहती स्थापन कराव्यात म्हणून आम्हालाही प्रोत्साहन द्यावे लागेल.
पण अमेरिका आम्हाला तसे करू देईल का? त्यांनी नाही म्हटले तर आम्हाला तैवान आणि अन्य देशांकडून अशी भूमी मिळवणे दुरापास्त होईल. आणि जरी आम्ही तैवान भारत व्हिएतनाम जपान यांच्याकडून काही जमीन मिळवली तरी ती देखील आम्हाला अपुरीच पडेल. शेवटी विशाल भूप्रदेश असलेल्या अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया यांच्या प्रदेशातच आम्हाला व्यापक वसती करावी लागेल. तसे करायचे तर अमेरिका ह्या प्रश्नाचा बंदोबस्त करावा लागेल. बहुसंख्य चिन्यांना अमेरिकेत स्थलांतर करायला लावून तिथेच एक नवा चीन स्थापित करावा लागेल जो चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशावर चालेल. अमेरिकेचा शोध खरे तर प्रथम पितवंशीयांनी लावला. पण कोलंबसाने श्रेय दिले गौरवर्णीयांना. त्याने काही बिघडत नाही. शेवटी आम्ही शोधली म्हणून अमेरिकन भूमीवर हक्क आमचाच आहे.
एक ना एक दिवस चीन आणि अमेरिका यांच्यात अस्तित्वाचा - जीवनमरणाचा संघर्ष होणार हे उघड आहे. पण आज आम्ही त्यावर उघड भाष्य करत नाही. कारण बाहेरील जगाशी आमचे संबंध त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यांचे भांडवल आणि त्यांचे तंत्रज्ञान ह्याची आम्हाला आज गरज आहे. म्हणून अमेरिका 'साफ' करण्यासाठी आम्हाला वेगळ्या कारवाया कराव्या लागतील. विघातक शस्त्रे न वापरता माणसे मारावी लागतील. तरच अमेरिकन भूमी आम्ही आमच्यासाठी राखून ठेवू शकू.
गेल्या काही वर्षात बायोलॉजिकल तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली आहे. आम्हीही झोपलेले नाही आहोत. आम्ही यातही प्राविण्य मिळवले आहे. अचानक अवघी अमेरिका पुसून टाकण्याची क्षमता आमच्याकडे आहे. कॉमरेड शाओ पिंग आमच्यात होते तेव्हा त्यांनी ठरवले विमानांमध्ये प्रगती करण्या आधी शत्रूच्या देशातील जनता मोठ्या प्रमाणावर मारण्याची गरज आहे. ही क्षमता प्राप्त करण्यावर आम्ही भर दिला.
बायोलॉजिकल शस्त्रे निर्घृण आहेत. अमेरिकन्स मारले जातील पण ते तसे मारले गेले नाहीत तर चिन्यांना मरावे लागेल. आपल्याच भूप्रदेशात चिनी अडकून पडले तर नुसत्या लोकसंख्या वाढीने ते नष्ट होतील. Yellow Catastrophes चा लेखक म्हणतो की असे झाले तर ८० कोटी चिनी मृत्युमुखी पडतील. आम्ही स्वतंत्र झालो तेव्हा ५० कोटी होतो. आज १३० कोटी आहोत. हे नष्टचर्य आमच्या किती जवळ आले आहे हे उघड आहे. २० कोटी अमेरिकनांना मारणे अमानुष आहे हे खरे आहे. पण तसे केले नाही तर चीन २१ व्य शतक आपला दावा करू शकणार नाही. असा चीन जो कम्युनिस्ट पक्षाच्या अधिपत्याखाली राज्य करतो आहे असा चीन अस्तित्वात राहू शकणार नाही.
म्हणून आमचा जीव की अमेरिकनांचा असा प्रश्न इतिहासाने उभा केलाच तर 'आमचा जीव' असे स्पष्ट उत्तर आम्हाला द्यावेच लागेल. एकाच झटक्यात अमेरिका संपवायची आहे. आम्ही लष्करी तयारी तैवान साठी करतो असे दाखवत असलो तरी तिचा रोख अमेरिकेवर आहे.
लष्करी तयारी म्हणजे विमानावर हल्ले अथवा उपग्रहांवर हल्ले नव्हेत. त्याही पेक्षा भीषण संहाराची तयारी अभिप्रेत आहे. मार्क्सने आम्हाला शिकवले की अहिंसा ही नव्या समाजाची सुईण आहे. आम्ही म्हणतो युद्ध ही चिनी शतकाची सुईण आहे. ते युद्धच नवा चीन जन्माला घालेल."
अपूर्ण भाग १० वाचा
अपूर्ण भाग १० वाचा
अहिंसा ही नव्या समाजाची सुईण आहे.
ReplyDeleteसुईण म्हणजे काय ताई ??
सुईण म्हणजे नवीन सृजन निर्माण करणारी। म्हणजे गर्भरशी बाईला मोकळं करणारी।
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteछान माहिती
ReplyDelete