Sunday, 19 February 2017

कोण या रॉबिन राफाएल?




कोण या रॉबिन राफाएल? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. त्यांची परवा आठवण आली ती पाकिस्तानीपत्रकार हमीद मीर याने इस्लामाबादवर F-१६ घिरट्या मारत आहेत असे ट्वीट केले म्हणून.
राफाएल बाईसाहेबांचा आणि भारतीय यंत्रणांचा संबंध आला तो त्यांची बिल क्लिंटन यांच्या काळामध्ये पाक - भारत - अफगाणिस्तान या प्रदेशाची सहायक सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाल्यानंतरऑगस्ट १९९३ ते १९९७पराकोटीचाभारत द्वेषाने पछाडलेल्या ह्या महिलेने आपल्या कारकीर्दीमध्ये जितके म्हणून जमेल तितके भारतीय हितसंबंधांचेनुकसान केलेराजा हरिसिंग यांनी भारतामध्ये विलीन होण्याच्या केलेल्या कराराची वैधताच बाई नाकारत असत.इथून सुरुवातहुर्रियतचे पुनरुज्जीवन - पंजाबमधील शिखांच्या फुटीरतेचे समर्थन - काश्मिरमधील संघर्ष हा एथनिकसंघर्ष असल्याचे अनुमान - तालिबान कल्पना मांडणे आणि तिच्यासाठी सर्व मंडळींकडून होकार मिळवणे अशा अनेकबाबी त्यांच्या दृष्टिकोनामधून अमेरिकन सरकार बघत होतेत्यांच्यामुळेच १९९३ च्या मुंबई बॉम्ब हल्ल्याप्रकरणीअमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरवण्यास नकार दिलाकाश्मिर हा विवादास्पद प्रांत आहे - Disputed Land - ही अमेरिकेची भूमिका ठरवणार्या बाईचराफाएल बाईंच्या वर्तनामुळे तीव्र नाराजी व्यक्त करताना श्रीबीरमण - जे एन दीक्षित आणि  एस दुलत हे वरिष्ठ भारतीय अधिकारी शब्द चोरून वापरत नसतअधिकार्यांशी पटलेनाही तरी राफाएलने भारतामधल्या अनेक ’बुद्धिवंत - विचारवंत - पत्रकार - पुरोगामी’ मंडळींशी सूत जमवले होते.त्यांच्या वर्तुळामध्ये त्या सहजतेने वावरू शकतही नाती पुढच्या काळातही त्यांच्या मदतीला येत.
बाईंचे पती अर्नोल्ड हे पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत होते १९८७ पासून - जेव्हा अमेरिका आणि पाकएकत्रितरीत्या अफगाणिस्तानातून रशियन फौजांविरुद्ध जिहाद खेळत होतेज्या विमानामध्ये पाकिस्तानचे (मीरअस्लम वगळतासर्व वरिष्ठ लष्कर जनरल्स -  वरिष्ठ अमेरिकन जनरल्स - आणि राजदूत अर्नोल्ड प्रवास करतहोते त्यातच आंब्याच्या पेटीमध्ये ठेवलेला बॉंम्ब फुटला आणि एकजात सगळे मारले गेलेपतीबरोबर ह्याउलथापालथीच्या काळामध्ये त्या इथे राहिल्या त्यामुळे या प्रदेशाची त्यांची ओळख बरीच जुनी आहे असे दिसते.
ह्या एक महिलेमुळे भारताला अमेरिकेशी उत्तम संबंध जुळवणे हे मुश्कील काम हो ऊन बसले होते१९९७ ते २००७मध्ये ट्युनिशिया - इराक युद्ध अशा जबाबदार्या सांभाळून २००७ नंतर वौशिंग्टनमधील एका लॉबींग करणार्याकंपनीमध्ये राफाएल आल्याया कंपनीकरिता जनरल मुशर्रफ यांच्या सरकारकडून पाकिस्तानची प्रतिमाआंतरराष्ट्रीय वर्तुळात उजळ करण्याचे काम त्यांना मिळालेत्यामुळे पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी सुरु झाली२००८ च्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या डेमोक्रॅट उमेदवार ओबामा यांनी अफगाणिस्तान विषयासाठी रिचर्ड होलब्रुकयांना आणलेओबामा यांच्या पहिल्या कारकीर्दीमध्ये त्यांच्या स्टेट सेक्रेटरी होत्या हिलरी क्लिंटनअर्थातच त्यांचे - होल्ब्रुक आणि राफाएल यांचे मेतकूट जमणे सोपे होते. (राफाएल यांचा पहिला मित्र ऍलर हा बिल क्लिंटन यांचाऑक्सफर्ड येथील रूममेटत्याने आत्महत्या केलीपुढे इराणमध्ये काम करताना त्यांचा आणि अर्नोल्ड यांचा विवाहझाला.) होलब्रुक प्रत्येक बाबीमध्ये राफाएल यांचा सल्ला घेत असततर राफाएल बाई यांचे नाव आणि त्यांचीभारतविषयक भूमिका अथवा पाकिस्तानचे प्रेम याबद्दल तुम्हाला अर्थातच फारसे वाचायला मिळाले नसेल असे गृहितधरून ही तोंड ओळख दिली आहे.
असोआठवण येण्याचे कारण सांगितले तरी मी उलगडा अजून केला नाहीहमीद मीर हे गाजलेले पाकिस्तानी पत्रकारआहेतओसामा बिन लादेन आणि अल् कायदाच्या वरिष्ठ नेते मंडळींना भेटू शकणारे ते पत्रकार आहेतजिओटीव्हीचे नामवंत पत्रकार म्हणून त्यांना अनेक ठिकाणी ’सहज’ प्रवेश मिळू शकतोत्यांचे विचार आपण आपल्याटीव्हीवरही अनेकदा ऐकत असतोअंगाला भरपूर तेल चोपडून बसलेला गडी आहेकधी अमेरिकेची - पाकिस्तानची - अल् कायदाची बाजू घ्यायची आणि क्षणभरात सावरून दुसरेही टोक गाठायचे हे हमीद मीर यांचे वैशिष्ट्यत्यांच्यावरकिमान दोन प्राणघातक हल्ले झाले आहेत.
राफाएल यांच्या ’उज्ज्वल’ कारकीर्दीला अचानक घरघर लागली ती नोव्हेंबर २०१४ मध्ये - म्हणजे मोदी सरकारआल्यानंतरत्याला कारण घडले ते एका मुलाखतीचेऑक्टोबर २०१४ च्या तिसर्या आठवड्यामध्ये ही मुलाखत दिलीहोती हमीद मीर यांनी शेखर गुप्ता यांच्या इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्रालामीर यांच्याबरोबर इम्रान खान यांच्यातेहरिक  इन्सान पार्टीचे नेते शफकत महमूदही होतेत्यात मीर यांनी एक जुना किस्सा सांगितला.
मीर म्हणाले -
"१९९४ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानांचा उदय झाला१९९५ मध्ये मी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबरोबरन्यू यॉर्क येथे गेलो होतोतिथे आमची भेट राफाएल यांच्याबरोबर ठरली होतीया भेटीमध्ये राफाएल यांनीतालीबानांना आपण पाठिंबा जाहिर करावा असे बेनझीर यांना सांगितलेमला ते आवडले नाहीजे तालिबान महिलाशिक्षणाला विरोध करतात त्यांच्या पाठिंब्यासाठी एक उच्चशिक्षित महिला इस्लामी जगतातील दुर्मिळ अशा एकमहिला राष्ट्रप्रमुखाला विनंती करते आणि ती मान्य होते हे विचित्र होतेमी तालिबानांच्या विरुद्ध होतोमाझ्याकॉलममध्ये मी त्यावर टीका केलीपरतीच्या प्रवासामध्ये माझ्या टीकेने संतापलेल्या बेनझीर यांनी मला सरळचप्रश्न केला - "तू माझ्यावर टीका का करतो?" मीही उत्तर दिलेत्यावर त्या म्हणाल्या, "तालीबान पाकिस्तानसाठी काआवश्यक आहेत हे आपले गृहमंत्री आणि अधिकारी तुला समजावून सांगतील." परतल्यानंतर काही दिवसातच त्यामंत्र्याने मला आणि माझा सहकारी नसरत जावेद याला बोलावून घेतलेउझबेकीस्तान ते पाकिस्तान अशी गॅसपाईपलाईन बनवायची आहेपण काबूल मधील सरकार - उत्तर अफगाणिस्तानातील प्रखर संघटना नॉर्थर्न अलायन्सहे भारताच्या आणि इराणच्या कलाने चालतातपाईपलाईनला संरक्षण कोणाचे नाहीत्याकरिता तालिबान वापरायचेआहेत असे स्पष्टीकरण मिळालेमी म्हटले ठीक आहे मी माझी भूमिका बदलेन पण माझी आणि मुल्ला उमर ची भेटघालून द्यात्यांनी मान्य केले आणी मी मुल्ला ओमरला कंदहारमध्ये भेटलोमला आश्चर्य वाटले की राफाएलअमेरिकन आहेत हेच त्याला माहिती नव्हते."
मीर यांची ही मुलाखत रिवाजाप्रमाणे भारतामधील अमेरिकन राजदूताने वॉशिंग्टनला पाठवलीहमीद मीर याने जेसांगितले त्यातून अन्य धागे जुळवणे शक्य झालेस्टेट डिपार्टमेंटकडे अन्य संदर्भ होतेच. (ते कोणी आणि कसेपोचवले असतील हे गूढ आहे.) तीनच दिवसात रॉबिन राफाएल यांचा सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्यात आला.त्यांच्या घरावर एफ बी आय ने धाड टाकून अनेक कागदपत्रे जप्त केलीत्यामध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे मिळालीचौकशी सुरु झालीपाकिस्तानमधील कारकीर्दीत बाई यु एस एड नामक कार्यक्रमाच्या प्रमुख होत्यात्यातर्फेचअमेरिकेचा पैसा खर्च केला जात असेह्याही व्यवहारामध्ये घोटाळे असल्याचे अहवाल होतेअर्थातच भारतअमेरिकन संबंधांमधला हा घशात रुतणारा काटा उखडून टाकला गेला.
आज दोन वर्षांनंतर त्यांच्यावर औपचारिकरीत्या कोणतेही आरोप ठेवण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याहीन्यायालयीन प्रक्रियेलाही तोंड देण्याची वेळ आलेली त्यांच्यावर आलेली नाहीपण अमेरिका - भारत संबंधांमध्ये बाईंचेमत आता गैरलागू झाले आहेकल्पना करा त्या अजूनही कार्यरत असत्या तर मोदी सरकारने जे कमावले आहे ते कधीशक्य झाले असते कायबीरमण यांचे लाडके शिष्य अजित दोवल आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेतत्यांनीआपले गुरु आणि अन्य वरिष्ठांच्या बाबतीत झालेल्या घटनांना ’न्याय’ दिला असे तर म्हणता येईलच पण भारतीयहित सर्वोपरी ठेवून हा ’काटा’ दूर करण्यात आलाअशा शेकडो विटा रचल्या गेल्या तेव्हा सामंजस्य झालेनाही तरलेमोआ आणि अन्य करार कधीच होऊ शकले नसते.

राफाएल बाईंची पोस्ट वाचून अनेक जण स्तंभित झाले असतीलपण साम दाम दंड भेद या वाटेनेच राज्यकर्ते जातअसतातमोदींच्या राज्यात साम ची भूमिका स्वतः मोदींकडे तर दंड ही (अनधिकृतजबाबदारी डाॕ. स्वामींवरअसावीदाम कोणाकडे असावे हे चाणाक्ष वाचक जाणतात तर सर्वात अवघड भेदाची रणनीती आखायला दोवलआहेतही मंडळी हरहुन्नरी असल्यामुळे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात गरज पडेल तसे लीलया एखादे काम पार पाडतात.
ही ढोबळ मानाने केलेली वाटणी असावीयाखेरीज इतरही मंडळी कामे करतच असतात पण ते काय कामगिरी पारपाडतात हे आपल्यासमोर येतही नाही.
ह्या वस्तुस्थितीचे भान  ठेवता अनेक जण मोदींवर रटफ लिहीत असतातअसले बाजारबुणगेच आपल्याभोवतीफार आहेत.


No comments:

Post a Comment