अमेरिकन सामाजिक आणि राजकीय जीवनावरती आपली पकड कायम ठेवणार्या माफियांबद्दल नवा विचार सुरू झाला होता. दुसरे महायुद्ध चालू झाले तसे याच माफियांचा अमेरिकन राजकरण्यांनी खुबीने वापर करून घेतलेला दिसतो. राजकारणामध्ये अतर्क्य शक्ती एकमेकांना साथ देताना दिसतात. व्यवसायाने वकील - आणि सरकारी प्रॉसिक्यूटर असलेले थॉमस ड्युई यांनी न्यूयॉर्क शहरामधल्या माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. (हेच ड्युई पुढे न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर म्हणून काम करत होते आणि १९४४ साली रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा होते.) कापो दि तुत्ती कापो - बॉस ऑफ द बॉसेस् म्हणून प्रसिद्ध असलेला गॅंगस्टर म्हणजे चार्ली लकी लुचान्या. १९४२ मध्ये ड्युईने अमेरिकेतील ह्या इटालियन माफिया गॅंगस्टरला वेश्याव्यवसाय चालवण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले आणि कोर्टामध्ये गुन्हा सिद्धही करून घेतला. पण दिवस महायुद्धाचे होते. न्यूयॉर्कच्या आसपासच्या समुद्रकिनार्याजवळ शत्रू सैन्याच्या हालचाली हो्ऊ लागल्या होत्या. त्यांची पक्की खबर देण्याचे जाळे फक्त माफिया गॅंगस्टर्स कडेच होते. अशा खबरी बॉस ऑफ द बॉसेस चार्ली लकी लुचान्याने आपल्या टोळ्या वापरून आरमाराला द्याव्यात आणि बदल्यात त्याला तुरुंगवास माफ करून आणि सिसिलीमध्ये परत पाठवावे असा निर्णय ड्युईने घेतला होता. चार्ली साठी हा सौदा ठीकच होता कारण सौद केला नाही तर तुरुंगात सडत राहावे लागले असते, अमेरिकेतील स्वच्छंद आयुष्य काही उपभोगता आले नसते. असे राहण्यापेक्षा जीवंतपणी त्याला - सिसिलीमध्ये का होई ना - स्वातंत्र्य उपभोगण्याचा रस्ता खुला होत होता. प्रत्यक्षात अमेरिकनांना दुसराही लाभ उठवायचा होता. त्यांना लुचान्यासारखे गॅंगस्टर्स आता सिसिलीमध्ये हवे होते. सिसिलीमध्ये राजकीय परिस्थिती बदलत होती. राजकारणी - माफिया आणि चर्च यांच्या संगनमताने चालणार्या कारभारापेक्षा जनतेला कम्युनिस्ट जवळचे वाटू लागले होते. जनमतातील बदलाचा प्रत्यय १९४७ मध्ये सिसिलीतील निवडणुकांमध्ये आला. निवडणुकीत कम्युनिस्टांचे बहुमत बघून व्हॅटिकन चर्चचेही धाबे दणाणले. त्यांनी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाला मदत करायचा निर्णय घेतला. सिसिलीमधून कम्युनिस्टांना हाकलण्यासाठी ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाने माफियांची मदत घ्यायचे ठरवले. अशा तर्हेने चर्चला गुन्हेगारीचे वावडे नव्हते हे सिद्ध झाले. चर्चला कम्युनिस्ट नको होतेच पण अमेरिकनांनाही कम्युनिस्ट नकोच होते. कम्युनिस्ट पक्षावरती मात करायची तर लोक ज्यांना घाबरतात त्या माफियांची मदत अनिवार्य होती. त्यामुळे त्यांनीही माफियांवर भिस्त ठेवली होती. पक्षाचे नेते म्हणून माफियांना मान्यता द्यावी आणि त्याबदल्यात माफियांनी कम्युनिस्टांना सिसिलीमधून हाकलावे असे ठरले. मग माफियांनी साल्वातोर ज्युलियानो ह्याला नेता म्हणून जाहिर केले. त्याचा सख्खा मामे भाऊ गॅस्पारी पिसोत्ता आणि ज्युलियानो एकत्र काम करत. १ मे १९४७ रोजी कामगार दिन साजरा करण्यासाठी प्याना देल्ली अल्बानेसी या पालेर्मो जवळच्या गावात आसपासचे गरीब शेतकरी व अन्य लोक जमले होते. सभेमध्ये त्यांचा कम्युनिस्ट नेता निकोला बार्बातो भाषण करणार होता. मुसोलिनीच्या फासिस्ट राजवटीत कम्युनिस्टांवर बंदी होती. ती उठताच निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. निवडणुकीचे निकाल जाहिर होऊन नुकतेच बारा दिवस झाले होते. बार्बातोचे भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते. एवढ्यात साल्वातोर - पिसोत्ता आणि अन्य साथीदार तेथे पोहोचले आणि त्यांनी सभास्थानी बेछूट गोळीबार केला. अकरा जण मरण पावले तर २७ जखमी झाले. ह्या शिरकाणानंतर लोकांनी "घ्यायचा" तो धडा घेतला - माफियांना कम्युनिस्ट नको आहेत हे स्पष्ट होताच घाबरलेल्या जनतेने जीव वाचवण्यासाठी आपल्या मर्यादेत राहणे पसंत केले. . नव्याने घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये कम्युनिस्टांचा पराभव झाला आणि ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाच्या तिकिटावर माफिया गॅंगस्टर निवडून आले. ही गोष्ट अशासाठी उद् धृत केली आहे की इटालीमधील राजकारणाचे वारे कसे वाहत होते याची कल्पना यावी.
अशाच वातावरणामध्ये सिंजोना मिलान शहरामध्ये पोहोचला होता. तेथे आपल्या कायदा विषयातील पदवीचा उपयोग करत त्याने टॅक्स कन्सल्टंट म्हणून कामाला सुरुवात केली. (Società Generale Immobiliare, Snia Viscosa) ह्या कंपनीमध्ये त्याने Accountancy कामाला सुरुवात केली. ह्या कंपनीची स्थापना ट्युरीन शहरातली! (याच शहराच्या जवळच्या ऑर्बासानो गावामध्ये श्रीमती सोनिया गांधी यांचे शालेय जीवन व्यतीत झाले. आणि त्यांचे पिताश्री स्टिफेनो मेनो हे कर्मठ कॅथॉलिक - मुसोलिनीचे समर्थक - युद्धामध्ये भाग घेतलेले आणि युद्धानंतरच्या आयुष्यामध्ये बांधकाम व्यवसायामध्येच होते). द जनरल कंपनीकडे इटालीमधली बिल्डिंग व्यवसायामधली मोठाली प्रॉजेक्टस् होती. व्हॅटिकनने कंपनीमध्ये पैसा गुंतवला होता. आणि रोमच्या आसपासची जमीन कंपनीच्या ताब्यात होती. (ह्या कंपनीचा उल्लेख The Godfather Part 3 ह्या कादंबरीत केलेला आढळतो. सिंजोनाने जी बॅंक बुडवली त्या घोटाळ्यामध्येही कंपनीचा सहभाग होताच!) दुसरी कंपनी होती स्निया. ह्या कंपनीमध्ये ट्युरीन शहरातील रिकार्डो जुलिनो यांनी गुंतवणूक केली होती. आणि तिचे दुसरे भागीदार होते ट्युरीनमधील सुप्रसिद्ध फियाट कंपनीचे उपाध्यक्ष जूवानी अग्निलो. (ह्याच फियाट कंपनीमध्ये सोनियाजींच्या बहिणीचा पती वॉल्टर व्हिंची इंजिनियर म्हणून काम करत असे. सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षणासाठी केलेल्या परदेशी वास्तव्यामध्ये श्री राहुल गांधी आपले नाव राऊल व्हिंची असे लावत असल्याचे सांगितले जाते.) कंपनीतर्फे रासायनिक उत्पादने तसेच संरक्षण विषयक उत्पादने (रॉकेट सिस्टीम) बनवली जात.
ह्या अनुभवानंतर कर कसा बुडवावा यामध्ये सिंजोनाचे सुपीक डोके करामती करु लागले. सिसिलीतील माफिया मिलानमध्येही काम करत. सिंजोनाने त्यांच्याशी संधान बांधले. व्हिटो जिनोव्हीजसारख्या बड्या माफियाशी उत्तम संबंध असल्यामुळे त्याने लवकरच मिलानमध्ये आपले बस्तान बसवले. इतकेच नव्हे तर कम्युनिस्टांचा पाडाव करण्याच्या समान भूमिकेमुळे चर्चही माफियांच्या जवळ आलेले होतेच. मसिनाच्या आर्चबिशपने सिंजोनाला मिलानमधील आर्चबिशप मॉन्तिनी यांच्या नावे शिफारसपत्र दिले होते. मॉन्तिनी यांचे शिक्षणही एका जेसुईट शाळेमध्ये झाले होते. सिंजोनाने आपल्या स्वभावानुसार त्यांच्याशी सूत जमवले. त्यांचे संपूर्ण नाव होते जूवानी बात्तिस्ता मॉन्तिनी. सिंजोनाच्या उत्कर्षामध्ये मॉन्तिनी यांचा मोठा वाटा असल्यामुळे त्यांच्याविषयी थोडी माहिती पुढील भागामध्ये घेऊ.
No comments:
Post a Comment