१९८४ मध्ये भाजपचे केवळ दोन खासदार निवडून आले तर राजीव काँग्रेसचे ४००+.
पक्षामध्ये नैराश्य पसरले. कार्यकर्त्यांना मरगळ आली. पुढे काही रस्ता उरलाय तरी का असे वाटू लागले होते. अशातच एक व्यक्तिमत्त्व होते जिने निराश व्हायचे नाकारले. ग्वाल्हेरच्या राजमाता श्रीमती विजयाराजे सिंदीया.
विजयाराजेंनी संघाच्या वरिष्ठ मंडळींची भेट घेतली. हे असे चालू ठेवायचे नाही, आपल्याला हातपाय हलवले पाहिजेत म्हणून आग्रह धरला आणि पुन्हा एकदा पक्षात चैतन्य आले.
२००९ साली परत एकदा अशी परिस्थिती आली. २००४ साली निवडणूक हरलो त्याचे जेवढे वैषम्य वाटले नव्हते तेवढे २००९ चे वाटले. २००९ चा पराभव बोचरा होता - चांगुलपणावरचा विश्वास उडवणारा होता.
यूपीए १ राजवटीत आपल्याला कोणी अडवणारे नाही जाणून एकामागून एक दहशतवादी हल्ले पाकिस्तान करत होता. २००६ चा मुंबई ट्रेनमधील स्फोट - मालेगाव १ - मालेगाव २ - समझौता - हैदराबाद हे कमी होते म्हणून की काय २६ नोव्हेंबर २००८ चा भीषण हल्ला देखील पाकिस्तानने घडवला. त्यानंतर अवघ्या सहा सात महिन्यात झालेल्या निवडणुकीत भा.ज. पक्ष परत हरला. मतदाराचा विश्वास मिळवू शकला नाही. ह्याने घोर निराशा पदरी आली. पक्षाचे बुद्धिमान वरिष्ठ मात्र यावर विचार करू इच्छित नव्हते.
अशावेळी डाॕ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कंबर कसली. ते पक्षात नव्हते पण यूपीएचे राज्य आपल्या मुळावर येणार याने अस्वस्थ असलेली मंडळी त्यांनी हेरली होती. ती लांब नव्हती - अवतीभवती होती.
स्वामींनी मोजक्या वीस एक लोकांना एकत्र आणले. त्यांची बैठक घेतली. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष काम केलेल्या अनुभवी लोकांची निवड केली होती. यूपीएचा पराभव करण्यासाठी काय धोरण असावे यावर विचारविनिमय झाला. काहींनी कामे वाटून घेतली.
लोकपाल कायद्यासाठी न थांबता उपलब्ध आहे त्याच कायद्याच्या चौकटीतून अडचणींतून आणि न्यायव्यवस्थेमधून मी भ्रष्टाचाराची प्रकरणे धसास लावेन अशी जबाबदारी स्वामींनी उचलली. अवाघ्या काही वर्षांत त्यांना यश मिळू लागले. यूपीएतील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीने जनता चिडून उठली. यानंतर पक्षाने प्रचाराची धुरा मोदींवर सोपवली आणि २०१४ मध्ये दिमाखदार यश मिळवले.
तत्त्वज्ञानाशी बांधिलकी सांगणारी विजयाराजे वा स्वामी यांच्या सारखी मंडळी जिथे असतात त्यांच्या लेखी रात्रीच्या गर्भात पहाट असते - असू शकते.
भ्रष्ट चिदंबरम यांच्या मागे आपली शक्ती उभी करणाऱ्या काँग्रेसकडे त्यांच्या तत्त्वज्ञानाशी प्रामाणिक असलेली कृतिशील माणसे उरली आहेत का?
x--o--x
एक घटना आठवते आहे का?
जून २०११ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री श्री प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून आपल्या आॕफिसमध्ये तेथील संभाषण चोरून ऐकण्याची उपकरणे दडवली असल्याची तक्रार केली होती.
अशा प्रकारची शंका आलीच तर हा तपास आयबीने करायला हवा होता. परंतु मुखर्जीँनी चिदंबरम यांच्या ताब्यातील आयबीला ते शोधण्यास पाचारण न करता आपल्या अखत्यारीतील सीबीडीटी सेंट्रल ब्यूरो आॕफ डायरेक्ट टॕक्सेस या संस्थेला ते तपासण्यास सांगितले होते. आयबीला काहीच मिळाले नाही तर सीबीडीटीने उपकरणे लावायचा प्रयत्न झाला असावा अशी शंका व्यक्त केली.
ज्येष्ठ मंत्री प्रणबदांवर संशय का घेतला गेला? कोणी घेतला होता? प्रणबदा आणि चांडाळचौकडीचे न पटण्याचा हा पहिलाच प्रसंग तर नव्हता. २००६ मध्ये यूपीएने सियाचेनमधून सैन्य माघारी बोलावण्याची तयारी चालवली होती व पाकिस्तान बरोबर तसा करार करण्याची तयारी पूर्ण केली होती. हा विषय जेव्हा केंद्रीय सुरक्षा समितीसमोर आला तेव्हा प्रणबदांनी त्याला जोरदार विरोध केला. विरोध नोंदवणारी दुसरी व्यक्ती होती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन. प्रस्तावाला झालेल्या विरोधामुळे करार होऊ शकला नाही. प्रणबदांनी चौकडीचा रोष ओढवून घेतला. पुढे २६/११/२००८ चे निमित्त करून नारायणन यांना पदावरून हटवून राज्यपाल म्हणून नियुक्ती मिळाली. प्रणबदा मात्र खेळी करत राहिले.
२०११ मध्ये असे काय घडले होते की यावेळी चौकडीची मजल बग्ज लावण्यापर्यंत गेली होती? कसे सांगायचे?
आज प्रणबदांना भारतरत्न मिळाले आहे. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात आहेत.
अच्छे दिन आ गये हैं.

सियाचेन सैन्य मागारीबाबत सविस्तर लिहावे
ReplyDeleteWe would like to know siyachen
ReplyDelete