Collection of my latest FB posts
26 June 2017
अधिकृत चिनी वर्तमानपत्र काय म्हणते पहा
26 June 2017
मोदी ट्रम्प भेटीच्या मुहूर्तावर चीनने कैलासमानस सरोवर यात्रा बंद केली. आज सिक्किमच्या नथु ला खिंडीजवळील दोका ला खिंडीत चिनी सैनिक घुसले. भारतीय सैनिकांशी हाणामारी झाली. भारतीय बंकर्स चिन्यांनी उडवून दिले बातमी आहे. दहा दिवसापूर्वी दार्जिलिंगमध्ये जे आंदोलन छेडले गेले त्याला चीनची फूस होती म्हटले गेले आहे.
या पार्श्वभूमीवर चिनी प्राध्यापिका हान हुआ म्हणतात की भारत अमेरिका तंत्रज्ञान कराराला आमचा आक्षेप नाही पण दक्षिण चीन समुद्रात भारताचे आधुनिकीकरण आणि गस्त याला आमचा आक्षेप आहे.
ही मुलाखत बघा
26 June 2017
मोदी ट्रम्प भेटीदरम्यान पाकिस्तान- अमेरिकन मैत्रीचा पायाच हादरून जाईल - खास करून अफगाणिस्तान पार्श्वभूमीवर - असे निर्णय होतील अशा धास्तीने पाकिस्तान भारत व अफगाणिस्तान येथील भारतीय हितसंबंधांवर हल्ले करून आपले उपद्रवमूल्य सिद्ध करण्याची संधी घालवणे शक्य नाही. काश्मीर - नियंत्रण रेषा - अमरनाथ यात्रा - अफगाणिस्तान मधील भारतीय प्रकल्प यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. मागे बिल क्लिंटन अटलाजींच्या कारकीर्दीत भारत दौऱ्यावर आले असता काश्मिरात ४० शिखांची निर्घृण हत्या पाकने दहशतवादी संघटना वापरून करवली होती. जित्याची खोड अशी जाणार नाही. सावध राहण्याची गरज आहे.
26 June 22017
दोका ला येथील चिनी हल्ला - चुंबी खोरे
सोबत दिलेला फोटो बघा. भूतान आणि सिक्किम यांच्या बेचक्यामध्ये असलेल्या चुंबी खोर्याचे नाव आपण कदाचित आज ऐकले असेल. पण भारतीय सैन्याच्या Threat Perception मध्ये त्याचे नाव ठळकपणे उल्लेखिले जात होते. चुंबी खोर्यामध्ये पाय टेकायला जागा हवी म्हणून चीनने भूतानकडे आपल्याला भूतानच्या पश्चिम सीमेवरची - खोर्याजवळची जमीन द्या म्हणून लकडा का लावला असेल याची नकाशा बघून तुम्हाला कल्पना येईलच. असा धोका गृहित धरूनच सैन्य आपली व्यूहरचना करत असते. गेल्याच आठवड्यामध्ये जनरल बिपिन रावत यांनी भारतीय सैन्य अडीच सीमांवर लढण्यास सज्ज आहे असे विधान केले होते. ह्या सर्वांची आज आठवण यायचे कारण अर्थातच चीनकडून नथु ला जवळील लाल टेन - दोका ला पोस्टवरील जोरदार हल्ला. नुकतेच रेपेयर केलेले बंकर्स चीनने उद्ध्वस्त केले आहेत. ह्या चकमकीचे कारण दाखवून नथु ला येथून कैलास मानस सरोवराकडे जाणार्या वार्या रोखण्यात आल्याचे चीनने जाहीर केले आहे. भारतीय सैन्याने चिनी लोकांचे खोर्यातील यातुंगपर्यंत रेल्वे ट्रॅक टाकण्याचे आणि रस्ते बांधणीचे काम थांबवल्यामुळे दोका ला येथे चकमक उडाली असे चीन प्रतिपादन करतो आहे. असे सांगितले जात आहे की ह्या चकमकी काही दिवसांपूर्वी झाल्या पण चीनने त्यांना प्रसिद्धी आता दिली आहे.
गेली काही वर्षे लष्करी तज्ञ सतत इशारा देत आहेत की खुनशी चीन भारताबरोबर एक मर्यादित अवधीचे युद्ध छेडेल ज्यामध्ये भारतावर झोंबरा हल्ल करून चिनी सैन्य पुनश्च आपल्या हद्दीमध्ये परत जाईल. पाण आपल्याला हात चोळत बसावे लागेल. सोबतच्या फोटोमध्ये उंचावर असलेले तिबेटचे पठार आणि कमी उंचीवरील भारतीय ताब्यात असलेला भूप्रदेश ओळखता येईल. चुंबी खोर्याजवळची जमीन भूतानने दिली तर त्याबदल्यात भूतानला अन्य ठिकाणची जमीन देण्यास चीन तयार आहे. चुंबी खोर्यामध्ये आपले वर्चस्व असले पाहिजे हा चीनचा आग्रह खूप जुना म्हणजे १९९० च्या दशकापासूनचा आहे. कारण हे खोरे ताब्यात असले तर संपूर्ण सिलीगुडी पट्टा आपल्या आधिपत्याखाली आणता येतो. म्हणून चीननए जिथे पाय रोवता येतील तिथे म्हणजे खंबा झॉंग ह्या चुंबी खोर्याच्या प्रवेशद्वारावरती आपली एक डिव्हिजन चीनने तैनात केली आहे तिला मॉडेल प्लेटो बटालियन असा किताब विषेष कौतुक म्हणून गेल्याच वर्षी शी जिन् पिंग यांनी केले होते.
चीनच्या थयथयाटाचे नेमके कारण काय? जोवर ओबामा ह्यांची कारकीर्द होती तोवर अमेरिका ही भारत चीन मामल्यामध्ये लक्ष घालणार नाही याची चीनला खात्री होती. आता ट्रम्प असे दुर्लक्ष करणार नाहीत ह्याची चीनला खात्री असल्यामुळेच ट्रम्प अडचणीत येतील अशा प्रकारच्या कारवाया करण्याचा सपाटा चीनने लावला आहे. मोदी ट्रम्प भेटीच्या मुहूर्तावरती भारताच्या सीमांवर सलग तोफांचे आवाज घुमणार आहेत अशी चिन्हे दिसत आहेत.
_________
27th June 2017
१९६२ पासून चीनचे अध्यक्ष माओ झे डाँग यांनी आपले 'पाच बोटे' धोरण स्पष्ट केले होते. ही पाच बोटे म्हणजे - लडाख - नेपाळ - सिक्कीम - भूतान आणि तत्कालीन नेफा किंवा आजचा अरुणाचल! हि पाच बोटे खुपसली तरच चीनला हिंदी महासागरापर्यंत पोचता येईल अशी माओची दृष्टी होती. (यामध्ये युद्धखोरी आहे यात वाद नाही पण याला 'दृष्टी' म्हणणे उचित ठरेल - माओच्या तुलनेमध्ये नेहरू कुठे बसतात तुम्हीच ठरवू शकाल) आजही चीनची सेने ते ध्येय विसरलेली नाही. चुंबा खोऱ्यामधला १५ दिवसापूर्वीच हल्ला हा त्या पाच बोटे धोरणाचा भाग आहे. चुंबा खोर्यावर नियंत्रण आले तर काय होऊ शकते? नकाशा बघितला तर कळेल कि ह्या खोऱ्याखाली भारताचा नाजूक भूभाग येतो ज्याला इंग्रजीत चिकन नेक म्हटले जाते. ८० कि मी चे चिकन नेक तोडले कि चीन थेट बांगला देश मध्ये प्रवेश करू शकतो. शिवाय ईशान्येकडील राज्ये भारतापासून तोडता येतात.
________
27th June 2017
१९५८ पासून जनरल थोरात नेहरूंना सावध करत होते की चीन भारतावर युद्ध लादण्याची तयारी करत आहे. त्यांच्या अनुमानाला जनरल थिमय्यांचा पाठिंबा होता. पण आम्ही बसलो होतो - हिंदी चिनी भाई भाई करत.
आताही लष्करतज्ञ सावधानतेचा इशारा देत आहेत. आपण सामान्य लोक म्हणतोय - छे युद्धच करायचे तर चीनला आतापर्यत अनेक संधी मिळाल्या पण त्याने युद्ध छेडले नाही.
आतापर्यंत छेडले नाही याचा अर्थ पुढेही छेडणार नाही असे मानता येईल का?
________
३० जून 2017
ज्या दिवशी मोदी - शी जिन पिंग भेट झाली त्यादिवशीची ही घटना - शी यांचे नाक कापण्यासाठी चिनी सैन्याने घडवून आणली. जो लढा पाकिस्तानात आहे तोच चीनमध्ये देखील आहे.
3rd July 2017
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय - पीटीआय वृत्त. जय हो.
कृत्रिम रीत्या किंमती पाडून स्वस्तातले पोलाद चीनने भारतात आणून टाकले तर आमच्या उद्योग व्यवसायांना ते हानिकारक ठरेल.
Press Trust of India @PTI_News
No entity can be allowed to avoid paying anti-dumping duty, as dumping of cheap #steel from #China adversely affects Indian steel sector: SC
7:20 PM · Jul 3, 2017
5th July 2017
मोदींच्या स्वागतासाठी इस्राएलचे संपूर्ण मंत्रीमंडळ काल बेन गुरीयन विमानतळावर आले होते त्याचे कौतुक आहे. इस्राएलची स्थापना झाली तेव्हा त्यांच्या संसदेने मंजूर केला तो पहिला ठराव भारताच्या जयजयकाराचा होता. "धन्य आहे भारतभूमी - जगामधला एकमेव देश जिथे ज्यूंचा कधीही छळ झाला नाही."
मा.नरसिंह राव यांनी १९९२ मध्ये प्रथमच इस्राएल बरोबर राजनैतिक संबंध स्थापित केले. त्याआधी भारतामध्ये इस्राएलची अधिकृत वकिलात सुद्धा नव्हती. तिथे जाण्याचा व्हिसा देण्याची सोय डाॕ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या घरातून करण्यात येत असे आणि घरावर इस्राएलचा झेंडा फडकवण्यात आला होता.
नरसिंहरावांची आज आठवण येणे स्वाभाविक आहे. जो इस्राएल आपले ऐतिहासिक ऋण मनापासून मानतो तिथे पंतप्रधानाने जाण्यासाठी ७० वर्षे गेली आहेत.
मोदींच्या इस्राएल भेटीतून नवा इतिहास साकारला जाईल यात शंका नाह
5th July 2017
बघा ट्रम्प साहेब का चिडलेत चीनवरDonald J. Trump @realDonaldTrump
·
4h
Trade between China and North Korea grew almost 40% in the first quarter. So much for China working with us - but we had to give it a try!
7th July 2017
"दक्षिण चीन समुद्रामध्ये निर्माण झालेल्या तणाव पूर्ण परिस्थितीमध्ये आणखी भर पडली आहे. चीनला डावलून व्हिएतनाम ने या समुद्रातील तेल विहिरींचे काम भारतीय कंपनी व एन जी सी ला दिले आहे. ज्याला धंदा करायचा आणि आर्थिक पायावर जग जिंकायचे आहे त्याला धमक्या देऊन प्रगती करता येत नाही. चीन इतका शेफारला आहे की हे समजायला वेळ लागेल त्यांना. व्हिएतनामने हे कंत्राट चीनला नाकारणे आणि भारताला बहाल करणे यामागे केवळ आर्थिक निर्णय नसून हा एक धोरणात्मक निर्णय आहे आणि चीनचे वागणे आपल्याला पसंत नसल्याची जाणीव इथे व्हिएतनाम करून देत आहे. ही एक मोठीच गोष्ट आहे."
8th July 2017
आमच्या मध्यम वर्गाचा असा समज झाला आहे की चीनला भारताशी युद्ध परवडणार नाही. तो असले साहस करणार नाही. फार तर गुरकावुन दाखवेल. 'परवडणार नाही' हा मध्यम वर्गीय विचार आहे. महिन्याचे उत्पन्न एवढे आहे - खर्च ह्याच्यावर जाता नये - वगैरे! असले विचार करून देश चालवता येत नाही. तिथे हिशेब वेगळे असतात. असा विचार करायचा तर भारताचा शेवटचा नागरिक उपाशी आहे तोवर आपण एक बंदुकीची गोळी सुद्धा विकत घेता नये. पण घेतो. कारण जे गाठीशी आहे त्याचे संरक्षण पण करावे लागते. नाही तर जवळ आहे तेही जग लुटून नेईल.
तेव्हा परवडणार नाही ह्या गृहितकावर जाऊ नका. शिवाय युद्धखोर माणसाची मानसिकता मध्यम वर्गीय नसते. स्वतःला जाळून टाकणारा जुगार खेळायला तो उतावीळ असतो. अशा मानसिकतेचे अर्थ कसे काढायचे हे लष्करी लोकांना उत्तम समजते. ते त्यांच्यावर सोडावे.
8th July 2017
चीनच्या परराष्ट्र खात्याने भारतामध्ये / प्रवास करणाऱ्या राहणाऱ्या आपल्या नागरिकांना advisory पाठवली आहे. "भारतामध्ये चिनी नागरिकांविरुद्ध द्वेषाची लाट असू शकते. स्वतःच्या सुरक्षेसाठी परिसरातील घटनांवर लक्ष ठेवा आणि भारतीय कायदे कानून यांचे काटेकोर पालन करा."
आपल्याला चिनी नागरिकांच्या सुरक्षेची - त्यांच्या कायदेशीर हक्कांची नेहमीच काळजी असते असेही त्यात म्हटले आहे. अनावश्यक प्रवास टाळा असाही सल्ला देण्यात आला आहे.
मला तर ह्यात लेकी बोले सुने लगे असा प्रकार जास्त वाटतो. चीन मध्ये राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या भारतीय लोकांनी ह्यातून धडा घेऊन अधिक काळजी घ्यावी. भारतात इथे सरकारी यंत्रणेची काही चूक झाली तर न्याय व्यवस्था आहे अगदी चिनी नागरिकाला सुद्धा त्याचे दार ठोठावता येईल पण चीन सारख्या देशामध्ये आपल्या नागरिकाला मात्र ती सोय तेच स्वातंत्र्य मिळेल ह्याची हमी नाही.
कदाचित काही चिनी नागरिकांवर भारत सरकार कारवाई करणार अशी चाहूल लागल्यामुळे आधीच कोल्हेकुई चालू झाली असेल अशीही शक्यता आहे. बघू या - बातम्या सांगतीलच काय होतंय ते
9th July 2017
मानससरोवराजवळील टाकलाकोट येथे जनरल जोरावर सिंग यांची समाधी आहे. १८४१ मध्ये त्यांच्या तुकडीने हा प्रदेश जिंकून घेतला. मानस सरोवर येथे भारतीय सैन्याने जिंकून घेतलेला आणि अजूनही तिथे फडकणारा मनतलाई झेंडा फतेह शिवजी पलटणीने चिन्यांच्या केलेल्या पाडावाची निशाणी आहे.
9th July 2017
एक मोदी ताठ उभे राहिले की किती जणांना आत्मबळ मिळतंय पहा.
Amrullah Saleh @AmrullahSaleh2
Afgh has refused to give land access to Pak to Central Asia demanding same for itself to India. Great move stemming from confidence.
11:43 am · 9 Jul 2017
11:43 am · 9 Jul 2017
10th July
जमाते पुरोगामींनी पाकिस्तानचे चार तुकडे होणार हाच धक्का अजून पचवलेला नाही. मग मी जर असे म्हटले की पाकिस्तान तो किस झाड की पत्ती है - चीनने आपल्या वागणुकीत बदल केला नाही तर भविष्यात त्याचेही पाच तुकडे अटळ आहेत तर माझे हे म्हणणे ऐकून जमाते पुरोगामी धाय मोकलून रडतील. शिनज्यांग - तिबेट - इनर मंगोलिया - हे प्रांत फुटायला उत्सुक आहेत.
असो. मित्रांनो, चिनी मालावर 'जमेल तेवढा' बहिष्कार घालण्यावर एकमत दिसते. आता पुढचे पाऊल! ग्यात्सो लामाने स्थापना केली म्हणून तिबेटमधील दोन नंबरच्या मोनॕस्ट्रीचा आधार घेत चीन म्हणतो की अरूणाचल म्हणजे दक्षिण तिबेट आहे आणि म्हणून चीनचाच प्रांत आहे.
मग आम्ही देखील म्हणतो ज्या कैलास पर्वतावर आमचे शंकर पार्वती वास्तव्य करतात आणि जिथपर्यंत पांडव स्वर्गारोहणाच्या प्रवासात पोचले तो पर्वत आणि ते मानस सरोवर आमचेच आहे. बऱ्या बोलाने चीनने येथून काढता पाय घ्यावा अन्यथा भारताला आपल्या हक्काची जमीन मिळविण्यासाठी यथाशक्ति प्रयत्न करावे लागतील.
हर हर महादेव!
जय हिंद
लढाई हा दोन बाजू मधला अंतिम मार्ग असतो आणी सैनिक हे त्याचे प्रमुख लक्ष्य असते, इतरही त्याची लक्षे असतात, त्या सोबत राजनैतिक समझोता हा एकमेव मार्ग असतो. १९६२ पासून भारत चीन यांच्या परस्पर संबंधात मी हे पाहत आलो आहे. आज आपण असे संबंध का राखू शकत नाही याचा विचार सैन्य,राज्यनैतिक, आणी सर्वसामान्य जनता यांनी , करायला पाहिजे.
ReplyDeleteमानव आहे तिथे विवाद असतात. सगळेच विवाद बोलणी करून वाटाघाटी करून सुटत नाहीत. तसे असते तर कुटुंबात घटस्फोट तरी कशाला झाले असते आणि ते घेण्यासाठी न्यायालयापर्यंत जाण्याची पाली का येते? जेव्हा दोन बाजूंमधला धटिंगण आपली मते दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न करतो - दुसऱ्याचे लुबाडून आपली तुंबडी भरायचा प्रयत्न करतो - त्या गोष्टींना विरोध होताच हात उगारतो तोच गोष्टी टोकाला नेत असतो. एकाच वेळी २३ देशांशी सीमावादाचे भांडण उकरून काढणारा आणि त्यासाठी युद्धाच्या धमक्या देणाऱ्या चीनच्या गुंडगिरी स्वरूपाविषयी त्याला संशयाचा फायदा द्यावा असे वाटते ह्यात दुटप्पीपणा - पक्षपात - कांगावखोरी लपलेली नाही का?
ReplyDeleteसद्य काळात अतिक्रमणे केवळ भौगोलिक सीमा ओलांडून होत नाहीत ! आतरराष्ट्रीय आणी मानवता वादी कायदे पळून सांस्कृतिक, व्यापारी स्वरूपाचे हल्ले सुद्धा चाळूऊ असतात.भूमी,समुद्र,आकाश आणी अवकाश या सर्व क्षेत्रांवर अतिक्रमणे होत असतात, शिक्षण, स्वास्थ्य, विचार सारणी आणी वैचारेक श्रद्धा स्थाने, समुद्री मार्ग, आकाशी मार्ग, प्रगतीकातेची स्थाने, या वारही अतिक्रमणे चालूच असतात. प्रमुखाने या मर्गाने समोरील देशाच्या प्रगतीकाराना पासून रोखणे हा उद्देश्य दिसून येतो.शक्ती पात आणी संपत्तीची हानी हे प्रमुख उद्दिष्ट असते. या सर्व बाबींचा विचार करून याला प्रती उत्तर द्यायला पाहिजे.
ReplyDeleteIndian govt has the wisdom to tackle them as required
ReplyDelete