Saturday 2 March 2019

किडन्या आणि पाकडे

Image result for ajit doval



पाकड्यांचे आणि किडनीचे काही तरी गहिरे संबंध आहेत असे नाही तुम्हाला वाटत?आठवून बघा. जेव्हा हे तुळतुळीत हनुवटीचे - वर्दीमधले जिहादी - ओसामा बिन लादेनला वाचवायचा शर्थीचा प्रयत्न करत होते तेव्हा देखील ओसामा बिन लादेन कसा किडनीच्या आजाराने वैफल्यग्रस्त झाला आहे आणि त्याच्यावर त्यासाठी इलाज चालू आहेत अशा बातम्या पसरवल्या जात होत्या. कधीतरी तर असेही वाचले होते की ओसामावरती पेशावरमधल्या पाकिस्तानी सैनिकी इस्पितळात इलाज चालू आहेत. ओसामा बिन लादेनला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानी संस्था त्याला आपल्या ताब्यात ठेवत होत्या असेही वाचल्याचे आठवते. अशा प्रकारे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेला ओसामा बिन लादेन लांबचा प्रवास देखील करू शकत नाही आणि एक दिवसा आड त्याला डायलिसिसची गरज भासत आहे असे रिपोर्टस् वृत्तपत्रे छापत होती. असल्या बातम्यांच्या ढीगामधून खरे काय ते शोधणे कठिण होते काय? सामान्य वाचकासाठी ते नक्कीच कठिण होते. पण बारकाईने बघितले तर ज्या व्यक्तीला एक दिवसा आड डायलिसिसची गरज आहे तो डॉक्टर आणि आधुनिक इस्पितळापासून लांब राहू शकतो का? त्याच्या इस्पितळात जायच्या यायच्या हालचाली लपून राहू शकतात काय? अगदी हेही खरे मानले की त्याच्यावर पाकिस्तानी सैनिकी इस्पितळामध्ये उपचार केले जात आहेत तरी देखील अशा बाबी गुप्त ठेवणे अवघड असते. आणि हेच खरे असेल तर ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानच्या डॊंगरदर्‍यांमध्ये कुठेतरी लपून बसला आहे आणि त्याचा ठाव ठिकाणा पाकिस्तानी गुप्तहेर संस्थांना लागत नाही हे जे सांगितले जात होते ते तरी खरे कसे मानायचे? 

असो. बातम्या जरी अशा पसरवल्या जात होत्या तरीदेखील प्रत्यक्षात परिस्थिती काय होती हे आता पुढे आलेच आहे. ओसामा बिन लादेनची सर्वात तरूण पत्नी स्वतःच डॉक्टर होती आणि त्याच्यावरती जुजबी इलाज घरीच करण्याइतपत सक्षम होती. अबटाबादच्या घरापासून पाकिस्तानी सैन्याचे प्रशिक्षण केंद्र दोन किलोमीटरच्या आतच होते. तो राहत असलेल्या इमारतीमध्ये बाहेरचा कोणीही येत नव्हता. आणि घरामधला कचराही बाहेर फेकला जात नव्हता. त्याच्या नोकरवर्गापैकी पुरुष मंडळी तेव्हढीच जरूरीचे सामान आणण्यापुरती बाहेर पडत होती. त्याचे निरोप घेऊन बाहेर पडणारा आणि त्याच्यासाठी बाहेरच्या जगाचे निरोप आणणारा त्याचा नोकर घरामध्ये शिरण्यापूर्वी सेलफोनच्या बॅटरी फोनमधून काढून ठेवत होता आणि बाहेर पडल्यानंतर १००-१५० किमी दूर जाईपर्यंत फोन चालू करत नव्हता. इतकेच काय त्या घरात ओसामाच राहतो की नाही याची तपासणी करण्यासाठी अमेरिकनांना लस टोचण्याचे नाटक करून बाहेरच्या डॉक्टरची मदत घ्यावी लागली होती.

आजारपणाची नाटके इतरांच्या बाबतीतही बघायला मिळाली आहेतच. सर्जिकल स्ट्राईकनंतर अचानक हाफीझ सईद आजारी पडला होता. आणि कित्येक महिने सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नव्हता. त्याच्या नावाने प्रसृत केल्या जाणार्‍या व्हिडियो क्लिपस् जुन्याच होत्या आणि ते सिद्ध करणेही सोपे होते. सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हाच मुजाहिदीनांना प्रोत्साहन देण्यासाठी हाफिझ घटनास्थळी हजर होता आणि हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला अशा बातम्या होत्या. पुढे एका चॅनेलने तर भारतीय सुरक्षा संस्थांनी टेप केलेले संभाषणही ऐकवले होते. त्यामध्ये गाझी - गाझी - गाझी को लग गया है - असे तंबूतील एक व्यक्ती आपल्या केंद्रात कळवत असल्याचे ऐकवले गेले होते. हा गाझी नेमका कोण होता? 

तर मित्रांनो, ह्या किडनीच्या आजाराचे वैशिष्ट्य काय असते मला तर काही ठाऊक नाही. म्हणजे तो कितपत लपवता येतो वा लपवायला बरा पडतो याची माहिती नाही.  पण ज्या अर्थी पाकडे हीच "इस्टोरी" वारंवार वापरत आहेत त्या अर्थी त्यांची ह्या प्रकरणी चांगलीच रंगीत तालीम यापूर्वी झालेली दिसते. एकदा तोंडपाठ केलेले डायलॉग परत वापरले जात आहेत. कष्ट कमी!! म्हणून आज जेव्हा अचानक मासूद अझरच्या बाबतीत हेच सगळे वर्णन वाचायला मिळाले आहे तेव्हा मात्र प्रत्यक्षात काय अवस्था असेल ती असो पण पाकडे सांगतात तशी नक्कीच नसेल याची खात्री पटते. 

हं - आता तर तुम्ही असेही वाचले असेल की ओसामा बिन लादेनला अमेरिकनांनी उचलून नेले तेव्हा पाकड्यांच्या सैन्यामधील निदान काही जणांनी - अगदी वरिष्ठ वर्तुळातील काही जणांनी - अमेरिकेला मदत केली असावी. तसे नसते तर अमेरिकेची विमाने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शिरूनही प्रतिकार का झाला नसावा? आणि ही विमाने कुठे अहिर्‍या गहिर्‍या गावाकडे गेली नव्हती भर अबटाबादमध्ये जाऊन चक्क उतरली होती. आणि तिथे चांगली पाऊण तास थांबली होती. तरीसुद्धा त्यांना कोणी हटकले नाही? आजूबाजूचे गावकरी जमा झाले आणि त्यांनी गोर्‍यांना हटकायला सुरूवात केल्यावर बंदूक दाखवून त्यांना थांबवावे लागले नाही काय? आणि हा आरोप खरा असेलच तर कोणत्या पाकिस्तानी अधिकार्‍यावर कारवाई झाल्याचे तुम्ही वाचले काय? फक्त एकाच इसमावर कारवाई झाली - तो डॉक्टर ज्याने त्या घरात जाऊन डी एन ए मिळवायचा प्रयत्न केला. 

अशीच मदतगार मंडळी पाकिस्तानी सैन्यामध्ये आजही असू शकतात - नाही का? ही मंडळी काय एक एकटी आपले काम चुपचाप पार पाडतात? की त्यांचाही एक गट आहे बरे? असलाच तर कुठे आहे? सैन्यात की आय एस आय मध्ये? की दोन्ही कडे? आणि अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प म्हणतात की India is trying something very big!!!

तुम्ही ज्याला दोवल नीती म्हणून ऐकता वाचता स्वतः त्यावर लिहिता त्या दोवल नीतीचा "साम दाम दंड भेद" मधल्या भेदनीतीवर भर असतो हे त्यांच्या पूर्वायुष्यातील कथा ऐकून समजू शकते. काश्मिरात काम करत असताना दोवल ह्यांनीच कूका परे ह्या एक् काळ विघटनवादी तरूणाला प्फोडले होते. हा कूका परे गुप्त रेडियो स्टेशनवरून आपले संदेश रात्री काश्मिर घाटीमध्ये देत असे. पण प्रत्यक्षात तो भारताचा दोस्त बनला होता. मिझोरममध्ये दोवलांनी लाल डेंगाच्या सहापैकी चार साथीदारांना फोडून स्वतःच्या घरामध्ये दोन चार महिने लपवून ठेवले होते. आणि फार काय डी गॅंगच्या बंदोबस्तासाठी त्यांच्याच प्रतिस्पर्धी गॅंगचा वापर करण्याची शक्कलही त्यांचीच होती. भेदनीतीतज्ञ असे आपण दोवल ह्यांचे वर्णन करू शकतो. त्यांनी पाकिस्तानामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये काय काय करून ठेवले आहे कोण जाणे!

आज आपल्याला मासूद अझरची कहाणी ऐकवली जात आहे. तिच्यामध्ये सुद्धा असेच अधांतरी धागे दोरे नाहीत काय? एकीकडे भर टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये वित्तमंत्री श्री अरूण जेटली म्हणतात की "जेव्हा ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानमधून उचलून नेले तेव्हा आम्ही फक्त विचार करत होतो की असे करणे आपल्याला जमेल काय? आज मी म्हणतो हे आम्ही देखील करू शकतो". 

तर मग मित्रांनो, हल्ले संपलेले नाहीत. पुलवामा प्रकरणाला टाळा आणि ताळा लागलेला नाही. जोवर संपूर्ण नाट्य उलगडत नाही तोवर प्रतीक्षा करा. जागते रहो. 

5 comments:

  1. ओसामा, दाऊद आता मसुद सगळ्यांना किडनीचाच त्रास ? ईतकं पाणी खराब आहे पाकीस्तानमधलं?

    ReplyDelete
  2. Bhau kal masud melyachi ? batmi eikli. pan vait vatl. Karan masud yach Maran bhartachya golin kinva bomban lihilel ahe.

    ReplyDelete
  3. मुळात अशिक्षित असल्याने पाकिस्तान मध्ये असा सखोल विचार करून काही वक्तव्य करणं वगैरे हे डोक्यावरून पाणी. ज्यांना केवळ स्वार्थच कळतो असे राजनयीक आणि शासन कर्ते आहेत,तेथे कायदा काय असावा? आणि वर तेथील जनता जिला भवितव्य नाही, फार काही जमलंच तर अरबी देशांमध्ये जावून त्यांचे गुलाम बनून बिगारी करायची, त्यांनी कुत्र्यागत दिलेल्या वागणुकीला धन्य मानायचे. हे मी स्वत: डोळ्याने बघितले आहे. आणि, एका स्वाभिमानी माणसाला त्याच्या अपरिहार्यतेवर रडताना देखील पाहिले आहे. ह्या देशातील हरामी शासनकर्ता वर्गाने तेथील सामान्य माणसाला विचारहीन करून ठेवलं आहे. त्यामुळे सारासार विचार करण्याची गरज कुणाला भासतही नाही. आज जगभर घृणीत झालेल्या पाकिस्तान ला भविष्यात काय उन्नती करता येईल ह्या बाबतीत अंधारच आहे.

    ReplyDelete
  4. आजच धनोआ म्हनाले कारवाइ अजून संपली नाही.

    ReplyDelete
  5. मासूम मसूद अझर मेला हे निव्वळ खोटं असणार .. या अफवाच इतक्या की खरं काय ते कोणालाच समजणे शक्य नाही ,अझरलाही ...

    ReplyDelete