Saturday, 1 April 2017

कोल्ड स्टार्ट म्हणजे काय?


Image result for general bipin rawat

३१ डिसेंबर २०१६ रोजी जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सेनादलाचे सूत्रे हाती घेतली. त्यानंतर इंडिया टुडे या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी Cold Start ह्या रणनीतीचा उल्लेख केला असा आरोप केला जातो. वास्तविक पाहता जनरल रावत यांनी हा शब्द वापरलाच नाही असे दिसते. भारत सध्या माउंटन कॉर्पस अशी एक नवी तुकडी तयार करत आहे. त्याविषयी प्रश्न विचारला असता श्री रावत म्हणाले की आजपर्यंत भारताचा पवित्र हा संरक्षणात्मक होता, घुसखोरी रोखण्याचा होता. आता माउंटन कॉर्पस ची स्थापना अशासाठी केली जात आहे की आमच्या संरक्षण क्षमतेवर शत्रूचा विश्वास बसावा.

थोडक्यात श्री रावत असे सांगत होते की शत्रूला आपण हल्ला अथवा घुसखोरी करूच नये असे वाटावे. आपण अगोचरपण केला तर त्याची जबर किंमत द्यावी लागेल असे शत्रूला वाटते तेव्हा तशा तयारीला विश्वासार्ह संरक्षण असे म्हणता येईल. रावत यांनी जे शब्द वापरले त्याचा मथितार्थ हा असा आहे.

म्हणजेच माउंटन कॉर्प्सची स्थापना होईपर्यंत भारताकडे विश्वासार्ह संरक्षण पवित्र नव्हता असे म्हणायचे आहे का? यासाठी एक जुना संदर्भ बघू या. २००१ मध्ये म्हणजे ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर जैश ए महंमद या संघटनेने भारतीय संसदेवर हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आपले सैन्य सीमेवरती काही महिने उभे ठेवले होते. ह्यामध्ये प्रत्यक्ष सीमेवरती असलेली तुकडी ही शत्रूने आत घुसू नये म्हणून काम करते. किंवा घुसलाच तर त्याचा बंदोबस्त करते. पण शत्रूच्या प्रदेशात जाऊन हल्ले करू शकत नाही कारण त्यांना तसे प्रशिक्षण नसते. अशा हल्ले करू शकणाऱ्या तुकड्या सीमेवरती नसतात. त्या देशांतर्गत काही शेकडा किलोमीटर दूरवर असतात. २००१ मध्ये अशा तुकड्या सीमेवर आणण्यासाठी भारताला जवळ जवळ तीन आठवडे लागले होते असा संदर्भ मिळतो. ही बाब पाहता भारत पाकिस्तानवर लगेचच हल्ला का करू शकला नाही याचे उत्तर मिळते. शिवाय ह्या तुकड्या सीमेवर पोहोचे पर्यंत पाकिस्तानने स्वतः च हल्ल्याचा निषेध करून राजकीय दृष्ट्या आपल्यावर मात केली कारण असा निषेध झाल्यानंतर भारताने युद्ध छेडणे म्हणजे जगासमोर आपण युद्धखोर असल्यासारखे दृश्य निर्माण झाले असते. म्हणजेच अशा प्रकारची काळ काढली गेलीच तर योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय नेतृत्वाचे हात बांधले गेले होते असे म्हणता येईल. अर्थातच जनरल सुंदरजी यांच्यापासून चालत आलेल्या आपल्या रणनीतीचा फेर विचार करणे अत्यावश्यक झाले.

(श्रीमती इंदिरा गांधी याना मार्च १९७१ मध्येच पाकिस्तान विरुद्ध युद्ध छेडायचे होते पण आपली तयारी नसल्याची कबुली जनरल माणेकशा यांनी दिल्यावर इंदिराजी नाराज होत्या असे स्वतः माणेकशा यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितले पुढे सैन्याने पूर्ण तयारीनिशी डिसेंबर १९७१ मध्ये युद्ध सुरु केले तो प्रसंगही आठवत असेल). ब्लिट्झ क्रीग ह्या प्रकारचे युद्ध हिटलरने युरोपाविरुद्ध छेडले आणि आपल्या आसपासचे देश काही दिवसातच पादाक्रांत केले कारण ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना त्यातून सावरायला आणि हल्ला परतवयाला वेळही मिळाला नाही. १९६७ चे इस्राएल अरब युद्धाची कथाही अशीच आहे. कमी मुदतीचे पण अत्यंत प्रभावी परिणामकारक आणि युद्धामागे योजलेले राजकीय हेतू साधणारे असे युद्ध ही आजच्या काळाची पद्धती आहे. भारतीय सैन्याची अर्थातच तशी तयारी नव्हती ही बाब २००१ नंतर पुढे आली. अर्थातच ती तुमचा शत्रूही टिपत असतो.

ह्या घटनेनंतर वाजपेयी सरकारने आपल्या तयारीचा नव्याने आढावा घेऊन काही सुधारणा करण्याचे ठरवले. या नंतर मार्च २००४ मध्ये ऑपेरेशन दिव्य अस्त्र ह्या नावाने भारतीय सैन्याने एक तालीम केली. ह्यामध्ये अशा कमी मुदतीच्या पण प्रभावी युद्धाची काही अंगे तपासली गेली होती. ह्यानंतर क्रमाक्रमाने आपण ऑपेरेशन वज्रशक्ती - डेझर्ट स्ट्राईक - संघ शक्ती -  अश्वमेध ह्याद्वारे अशा प्रकारच्या युद्धाचा सराव करत आलो आहोत. अशा प्रकारच्या क्षमतेला पाकिस्तान घाबरेल नाही तर काय? पाकिस्तानची रुंदी किती आहे? नकाशा बघा. मुसंडी मारायची ठरवलेच तर ते कसे शक्य आहे तुम्हाला कळेल.

बिपीन रावत यांनी अशा Cold Start तयारीविषयी काहीच विधान केले नाही पण विश्वासार्ह प्रत्युत्तर देण्याची क्षमता आम्ही बाळगू आणि सतत तयारीत राहू माउंटन कॉर्पस हा त्याचाच एक भाग आहे असे त्यांनी उत्तर दिले होते. पण म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे. तसे भारताने कोल्ड स्टार्टची क्षमता मोदी सरकार आल्यानंतर विकसित केली असल्याची स्वप्ने चीन आणि पाकिस्तानला पडत असावीत. आणि सेनाप्रमुखांच्या उत्तरावर त्यांना काही निष्कर्ष काढणे सोपे जात आवे.

बाकी भारताने जी क्षमता विकसित केली आहे तिला कोल्ड स्टार्ट म्हणायचे की नाही ह्या तांत्रिक वादामध्ये ना पडता पाक अथवा चीन कडून चिथावणी आलीच आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचे ठरलेच तर भारत तसे करू शकतो असे आपण गृहीत धरू पण खऱ्या प्रश्नांची सुरुवात तिथेच होते. अशा प्रकारची कारवाई तेव्हाच हो उ शकते जेव्हा आपण गृहीत धरतो की पाकिस्तानकडे आण्विक अस्त्रे असली तरी पहिल्याच फटक्यात त्यांचा वापर त्याला करता येणार नाही. पण भारताच्या ह्या कारवाईला उत्तर म्हणून तो ह्या संघर्षाची व्याप्ती वाढवू शकेल का असा प्रश्न पडतो. शिवाय आपल्या कारवाईची परिणती अणुयुद्धात होउ नये म्हणून काय करावे लागेल याचाही विचार करावा लागतो.

भारताने अशा प्रकारचा हल्ला केलाच तर आपण असे उत्तर देऊ की युद्ध लांबत जाईल हा भास म्हणा आभास म्हणा जगासमोर उभा करण्यात पाकिस्तान यशस्वी झाला तर त्याची रणनीती यशस्वी ठरेल असे त्याला वाटते. वरती म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानकडे रुंदी नाही युद्ध खेळायला जमीन नाही आज एखाद्याने जैसलमेरहून सकाळी निघायचे म्हटले तर गाडीत पुन्हा पेट्रोल न भरता संध्याकाळपर्यंत तुम्ही आरामात अफघाण सीमेपर्यंत पोहोचू शकता. म्हणून पाकिस्तानला पंजाब नाही तर काश्मीरची भूमी हवी असते. तिथली प्रजा पाकिस्तानच्या बाजूची असेल तर भारताची डोकेदुखी वाढते. भारत तेरे तुकडे होंगे ही घोषणा ह्यासाठी हवी असते. कारण अशा फितूर प्रजेच्या मागे उभे राहायला इथले फेक्युलर कसे पुढे सरसावतात हे आपण गेली काही वर्षे बघितले आहेच.

पाकिस्तान काय करणार हे गृहीत धरून अशा कमी मुदतीच्या युद्धाचे ध्येय हेच असू शकते की त्याची युद्ध करण्याची क्षमताच अशा पद्धतीने उद्ध्वस्त करायची की प्रत्युत्तर देणे दुरापास्त होईल. दुसरे ध्येय हे असले पाहिजे की कधी काय करायचे हे निर्णय घेण्याची त्याची क्षमताच नष्ट करणे. भारताकडे ह्याची उत्तरे शोधणारे आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या राजकीय नेतृत्वाची आजवर वानवा होती. ते नेतृत्व आज दिल्लीत बसले आहे म्हणून फडफडाट चालू आहे. पण हा आवाज गडगडाटाचा आवाज मारू शकणार नाही. ह्या गुंतागुंती बघता उठसुठ मोदी सरकार पाकिस्तानवर कारवाई करत नाही म्हणून बॉम्ब ठोकणाऱ्यांना ह्यातले काही काळात नाही असेही आपल्या लक्षात येते.

ज्या पद्धतीची आव्हाने पाकिस्तान आणि चीनने भारतासमोर उभी केली आहेत ती  बघता अशा प्रकारची तयारी ठेवणे हे भारताने ठरवले तर त्याला आज जग दोष देणार नाही. कारण जगासमोर भारताची विश्वासार्हता आहे तशी पाकिस्तानची नाही हे कटू सत्य आहे. आणि इथल्या फेक्युलरांनी ते लपवले तरी कोंबडे ओरडणारच.




No comments:

Post a Comment