कोर्टाकडून ओमर सईदची सुटका "कोणीतरी" आज करून घेतली असली तरी अशी माणसे त्याची तयारी खूप आधीपासून करत असतात. ओमर सईदच्या बाबतीतही हेच खरे आहे. जिहादी आपल्या प्राणावर उदार होतो हे जरी खरे असले तरी हल्ल्यामध्ये त्याच जीव वाचलाच तर निदान न्यायसंस्था वा राज्यसंस्था त्याचा प्राण घेणार नाहीत यासाठी त्याचे उर्वरित जिहादी साथीदार त्याच्या बचावासाठी जिवाचे रान करतात. ह्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. ओमर सईदसाठी देखील कोणीतरी असेच जीवापाड प्रयत्न करत होते. आणि जिहादींना त्यांच्या कामी मदत करणे हे लिब्बूंसाठी मोठ्या मानाचे आणि पवित्र कार्य असते. ओमर सईदला कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी दोन गोष्टींची गरज होती. त्यातली पहिली गोष्ट होती की खून त्याने केलेला नाही हे सिद्ध होणे आवश्यक होते. त्यासाठी लिब्बूंनी एका युनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांना कामाला लावले. अमेरिकेतील जॉर्जटाऊन या प्रतिष्ठित विद्यापीठाने २००७ साली शोध पत्रकारितेच्या अंतर्गत एक प्रकल्प हाती घेतला. त्याचे नाव पर्ल प्रॉजेक्ट असे ठेवण्यात आले. हा प्रकल्प २०१० पर्यंत चालला. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन प्रकाशनाचे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या खुनाचे प्रकरण यामध्ये तपासासाठी घेण्यात आले होते.
या खटल्यामध्ये ओमर सईदने डॅनियलचे अपहरण करण्यासाठी आपण मदत केली हे प्रथमपासून कबूल केले होते पण प्रत्यक्ष अपहरण झाले तेव्हा आपण कराची शहरमध्येही उपस्थित नव्हतो असे तो सांगत होता. मग त्याच्या खुनामध्ये गुंतण्याचा प्रश्नच उद् भवत नाही अशी भूमिका घेतली होती. तेच सूत्र धरून प्रकल्पाने आपले काम सुरू केले होते. प्रकल्पातील सदस्यांच्या असे लक्षात आले की ग्वांटानामो बे मध्ये अमेरिकेने जे खतरनाक दहशतवादी नेऊन ठेवले होते त्यामध्ये खालिद शेख महंमदचा समावेश आहे. ९/११ हल्ल्याचा आयोजक म्हणून खालिदवर अमेरिकेने आरोप ठेवले होते. खालिदने अमेरिकनांना कोणताही कबूलीनामा दिलेला नव्हता. मग अमेरिकनांनी त्याला वॉटरबोर्डींगचे तंत्र एकदा नव्हे तर तीन वेळा वापरून त्याच्याकडून कबूलीनामा वदवून घेतला होता असे खालिदचे बचावकर्ते म्हणतात. त्यामध्ये खालिदने आपणच डॅनियलला मारले हे कबूल केले होते. ह्या गुन्ह्याची जबाबदारी एकदा खालिदने घेतल्यावर त्यातील गुन्हेगार म्हणून ओमरची जबाबदारी शून्यावर येईल व ओमरचा सुटकेचा मार्ग सुकर होईल असे प्रकल्पातील सदस्यांचे म्हणणे होते. गुन्हा खालिदने कबूल केला म्हणून आधी डॅनियलला सोडवायचे मग वॉटरबोर्डींग करवून कबूलीनामा घेतला म्हणून खालिद निर्दोष असेही सिद्ध करायचे असा हा डाव होता. माझ्या उजव्या हाताचा वापर करून मी डॅनियलला ठार मारले असे खालिदने सांगितले होते. डॅनियलचे मुंडके खालिदनेच उडवले हे सिद्ध करण्यासाठी केवळ खालिदच्या साक्षीवर अवलंबून न राहता प्रकल्पातील सदस्यांनी व्हेन मॅचींगचे नवे तंत्र इथे लावून बघितले. डॅनियलचे मुंडके उडवले तो व्हिडियो एक काळ व्हायरल झाला होता. त्यामध्ये गळा कापणार्याचे हात स्पष्ट दिसतात. त्या हातावरच्या नसा आणि खालिद शेखच्या हातावरील नसा तंतोतंत जुळतात असा शोध ह्या प्रकल्पातील सदस्यांनी लावला. या circumstantial पुराव्यावर खालिद हाच डॅनियलच्या खुनाचा गुन्हेगार आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. शिवाय व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये एक दोषही आहे असे त्यांचे अनुमान होते. मूळ व्हिडियोमध्ये खालिदने जेव्हा त्याच्या मानेची शीर कापली तेव्हा चित्रीकरण बरोबर झाले नाही म्हणून कॅमेरामन खालिदला पुन्हा अक्शन द्या म्हणून सांगतो व कॅमेरासाठी म्हणून आधीच मारल्या गेलेल्या डॅनियलच्या मानेवरून खालिद पुन्हा एकदा सुरा चालवत शीर कापल्याचा अभिनय करतो असे दिसते. हा निष्कर्ष प्रकल्पातील सदस्यांनी काढलेला आहे.
अपहरण नाट्याला आपण मदत केली पण ते प्रत्यक्षात घडले तेव्हा मी कराचीमध्ये नव्हतोच असे सांगणार्या ओमरच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवता येईल बरे? तो भाग आपण पुढच्या भागांमधून सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी आणखी एका बाबीमधून ओमरच्या नावावरील डाग पुसून टाकणे अनिवार्य झाले होते. ते प्रकरण होते ९/११ च्या हल्ल्यासाठी एक लाख डॉलर्स पाठवण्यात आले होते त्याचे. १ ऑक्टोबर २००१ रोजी न्यू यॉर्क टाईम्सच्या ज्यूडिथ मिलर यांनी मुस्तफा अहमद नावाने हे पैसे पाठवण्यात आले होते असे छापले होते. पण हा मुस्तफा कोण याचा उलगडा झालेला नव्हता. तो खुलासा द गार्डियन या वृत्तपत्राने दोन दिवसांनी केला आणि मुस्तफा अहमद म्हणजेच ओमर सईद असे गार्डियन छापले होते. याच दिवशी काश्मिर विधानसभेवर हल्ला चढवण्यात आला होता. यातून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातवरण तयार झाले होते. भारतीय सूत्रांनी केलेल्या तपासामधून हाच उलगडा पुढे झाला. मुस्तफा अहमद हे नाव खुद्द ओमर सईदच वापरत होता असे दुवे मिळू लागले. सीएनएनच्या मारिया रेसा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चा विद्यार्थी शेख सईद म्हणजेच मुस्तफा अहमद असून त्याला १९९९ मध्ये IC 814 विमान अपहरण प्रकरणी भारत सरकारने सोडून दिले होते इतका स्पष्ट उल्लेख छापला तो ऑक्टोबर ६, ७ व ८ रोजी. सात ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये उतरले. याच दिवशी अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या आय एस आय प्रमुख महमूद अहमद यांच्या विरोधात निर्विवाद पुरावा देऊन त्यांना तात्काळ हकालपट्टी करावी म्हणून मुशर्रफना सुनावले होते. ९ ऑक्टोबर रोजी टाईम्स ऑफ इंडियाने एक स्फोटक बातमी छापली. वृत्तानुसार जनरल अहमद यांचे ९/११ च्या हल्लेखोरांशी असलेल्या संबंधांचे पुरावे भारतीय सूत्रांनी अमेरिकेच्या हाती सोपवले म्हणून त्यांची हकालपट्टी झाली असल्याचे म्हटले होते. जनरल अहमद यांच्या सांगण्यावरून ओमर सईदने मोहमद अट्टाला हे पैसे पाठवले होते याचे स्पष्ट पुरावे भारताला मिळाले होते असे टाईम्सने छापले. असे म्हणतात की दुबई येथील ज्या खात्याचा वापर करून ओमर सईदने पैसे पाठवले ते खाते उघडताना भरलेल्या फॉर्मची नक्कल भारतीयांच्या हाती लागली होती आणि त्यातूनच हा मुस्तफा अहमद म्हणजेच ओमर सईद असल्याचे अगदी थेट सिद्ध झाले होते. ११ डिसेंबर २००१ रोजी झकेरियस मसावी या विसाव्या हल्लेखोरावर अमेरिकेने भरलेल्या खटल्यामध्ये मुस्तफा अहमदचा उल्लेख आरोपी म्हणून करण्यात आला होता. यातून हेच दिसते की भारतीय सूत्रांनी अमेरिकनांच्या हाती सोपवलेला पुरावा किती निर्विवाद असेल.
पण मुस्तफाकडे तरी पैसा आला कुठून असा प्रश्न होता. त्याचा पाठपुरावा करताना भारतातील एका गुन्ह्याकडे लक्ष वेधले गेले. जुलै २००१ मध्ये कोलकातामधील खदिम शूज नामक व्यवसायाचा मालक पार्थप्रतिम रॉय बर्मन याचे अपहरण करण्यात आले होते. त्याला बांगला देशाच्या सीमेवरती बंधा म्हणून ठेवण्यात आले होते. त्याच्याकडून सुमारे चार कोटी इतकी खंडणी वसूल करण्यात आली. हे पैसे दुबईच्या बॅंकेत जमा केले होते. अपहरण प्रकरणातील फरहान मलिक हुजी या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. त्याचे व आफताब अन्सारीचे संबंध चांगले होते. आफताब अन्सारीने कोलकाताच्या अमेरिकन कल्चरल सेंटरवर हल्ला चढवला होता. भारतीय तुरूंगात असताना ओमर सईदने या दोघांशी दोस्ती केली होती. खंडणीचे पैसे सईदने मोहमद अट्टाला पाठवले असे आरोप केले जात होते. पण हा मामला एवढाच नव्हता. ९/११ चे हल्लेखोर अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी अगोदर पाकिस्तानात येत असत. पण पाकिस्तानात येण्यापूर्वी ते दुबईमध्ये थांबत असत. दुबई येथील वास्तव्यामध्ये ओमर सईद त्यांची देखभाल करत होता व त्यांना रोखीच्या रूपात पैसा देत होता असेही दिसून आले होते. ९/११ च्या हल्ल्यानंतर हा तपास उजेडात आला होता.
९/११च्या हल्लेखोरांना मुस्तफा अल हौसावी नामक इसमाने पैसे पाठवले होते. सुरूवातीला हा हौसावी म्हणजेच ओमर असावा असा गैरसमज जरूर होता पण पुढे हा हौसावी म्हणजे एक सौदी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अमेरिकेने अफगाणिस्तानमधून ताब्यात घेऊन ग्वांटानामो बे मध्ये ठेवले होते. पण ह्या गैरसमजामुळे मुस्तफा अहमद हेही पात्र असेच खोटे असल्याचा गैरसमज सर्वत्र करून देण्यात आला होता. ह्यातूनच ओमरवरील ९/११ च्या हल्ल्याला मदत केल्याचा डाग धुवून निघण्याची आशा निर्माण झाली होती.
संशयाचे ढग निर्माण करून आपल्या हस्तकांना सोडवण्याचे तंत्र आता जिहादींनी अगदी पक्के केले आहे. आणि ओमर सईदच्या बाबतीमध्येही ते यशस्वीरीत्या वापरले गेले असावे. ओमर बाबत अशीच अनेक गूढ रहस्ये दडली असून ती निदान आता तरी उजेडात आणणे गरजेचे आहे.
पुढे चालू.
ताई खादीम का श्री लेदर चा मालक ?
ReplyDeleteHe was CMD of Khadim Shoes
Deleteमँडम, कोणत्याही रहस्यकथेपेक्षा रोमांचक आणि भयानक आहे हे. हे लिब्बू जिहिदीपेक्षा भयानक आहेत यांना सामान्य माणसाशी काही देणघेणे नाही. मानवाधिकारवाले पण असेच, अतिरेक्यांनी कितीही सामान्यांचा जीव घेतला तरीही चालेल पण अतिरेक्यांवर अन्याय होता कामा नाही, हा यांचा खाक्या आहे. कसाबच्या बचावासाठी मध्यरात्री कोर्टाचा दरवाजा खटखटवणारे पण याच जातीतले.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteस्वातीजी, आपल्या आणि आपल्या वाचकांच्या विचारपद्धतीशी सर्वस्वी सहमत होणे अवघड आहे. इथेच वरती असलेले श्री टाकळे यांच्या प्रतिक्रियेचे उदाहरण घ्या. (त्यांच्या प्रतिक्रियेच उदाहरण घेतल्याबद्दल श्री धनंजय टाकळे नाराज झाले तर त्यांची मी माफी मागतो.) ‘मानवाधिकारवाले पण असेच, अतिरेक्यांनी कितीही सामान्यांचा जीव घेतला तरीही चालेल पण अतिरेक्यांवर अन्याय होता कामा नाही, हा यांचा खाक्या आहे’ यातून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे? मानवाधिकारवाले किंवा लिब्बू यांच्याबद्दल अनेकांना राग असणे समजू शकते. पण त्याचे कारण निश्चित विचारपद्धतीचा अभाव हेच आहे. आता वरच्या प्रतिक्रियेत श्री. टाकळे यांना काय म्हणायचे आहे? अतिरेक्यांनी अनेक सामान्यांचा जीव घेतला म्हणून त्या अतिरेक्यांनाही अन्यायाने शिक्षा द्यावी? कोणत्याही प्रक्रियेविना त्यांना मारून टाकावे? मग सरकार हेही दुसरे एक अतिरेकीच ठरणार नाही काय? आपण अफगाणिस्तानमधल्या तालिबानला मग नेमका का दोष देत असतो? ते बरोबर असेच वागत नाहीत का? अशी संशयितांना प्रक्रियेविना खतम करण्याची यंत्रणा जर अधिकृत बनली असती तर आणीबाणीत नेमके काय घडले असते? आपण कायद्याचे उद्दीष्ट बदलायला हवे असे कुणी म्हणेल तर ते समजता येईल, त्यावर चर्चा करता येईल. पुराव्याच्या गरजा आरोपींच्या पक्षपाती आहेत. त्या थोड्या सौम्य केल्या जाव्यात अशासारख्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. कायद्याची प्रक्रिया फारच वेळकाढू आहे, ती जलद व्हायला हवी, गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार कायद्याची प्रक्रिया लवचिक असावी या गोष्टी निदान विचारात तरी घेता येतील. पण प्रक्रियेला सोडचिठ्ठी कशी देता येईल? अतिरेक्यांसाठी, बलात्कार्यांसाठी काही प्रक्रियाच नसावी, त्यांना पोलिस किंवा लोकांनी थेट शिक्षा करायला हवी हे तर्कशास्त्र वेडेपणाचे आहे. प्रक्रियेत बदल हवेत हे म्हणणे निराळे आणि अतिरेक्यांवर अन्याय होता कामा नाही असे म्हणणारे चालणार नाहीत हे म्हणणे निराळे. अन्याय कुणावरच व्हायला नको, मग त्यात अतिरेकीही आलेच असेच आपले उद्दिष्ट नको काय?
ReplyDeleteYou can settle with Takle about his comment separately. My article does not mention his points. However fact remains that the terrorists do not believe in or cooperate with any judicial system except sharia but take 1000% advantage of the facilities it provides.
Delete1000 % true
Deleteरोचक माहिती
ReplyDeleteमानव अधिकार संघटना अतिरेकीचा विनाकारण बाली जाऊ नये यासाठी काम करत आहे हे बराबर आहे परंतु हीच मानव अधिकार वाले काश्मीर मधून जे लाखो लोक ज्यांना त्यांच्या मायभूमी तुन हाकलून दिले हे खरे असतांना देखील ते त्यांच्या करिता काम करतांना दिसत नाहीत त्यांचे काय ?
ReplyDelete