Thursday 30 August 2018

जमाते पुरोगामींची कवायती फौज


Image result for romila thapar grover bhushan




दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी देशभरातून पाच वरिष्ठ माओवादी नेत्यांना ताब्यात घेतले. - ह्या घटनेनंतर तमाम जमाते पुरोगामी युद्धाच्या मैदानात उतरले असून आपले सामर्थ्य किती आहे ह्याची चुणूक त्यांनी अगदी थोडक्या अवधीमध्ये दाखवून दिली आहे.

ज्या गतीने श्रीमती रोमिला थापर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी दाखल झाल्या - सोबत १५ ख्यातनाम वकिलांची फौज दिमतीला घेऊन - दिल्ली उच्च न्यायालयामध्ये श्री गौतम नवलखा ह्यांच्य अटकेवरती त्यांच्या वकिलांनी अवघ्या काही तासाच्या तयारीने घेतलेल्या आक्षेपांना पुणे पोलिसांना न्यायालयाचे समाधान करणारी उत्तरे देता आली नाहीत - इथे पुणे कोर्टामध्ये हेच नाट्य रंगले - सर्वोच्च न्यायालयाने एकंदर प्रकरणावरती घेतलेला रोख - हे सर्व होत असतानाच माध्यमांनी माओवाद्यांच्या समर्थनासाठी घेतलेली सर्वंकष उडी - मुंबई येथे तब्बल ३७ स्वयंसेवी संघटनांनी घेतलेली वार्ताहर परिषद - मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटिस - आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून भाजप सरकारवरती टीका - सरकार मागल्या दाराने आणिबाणी लागू करत असल्याचा आरोप - पकडले गेलेले माओवादी निखालसपणे केवळ असल्याचे ठाम प्रतिपादन! बाबा माझ्या!

एक गोष्ट निर्विवादपणे मान्य केली पाहिजे की जमाते पुरोगाम्यांकडे "कवायती" सैन्य आहे. आणि ते प्रत्येक क्षणी सज्जच आहे. त्याविरुद्ध भाजप सरकार व पक्षाची टीम तोकडी पडली असे दिसते. कल्पना करा की ह्याच प्रकारे यूपीएने भाजपशी संलग्न असलेल्या पाच जणांना असेच आरोप करत उचलले असते तर आज काय वातावरण असते?

उचललेल्या लोकांना देशातील सर्वोत्तम वकिल मिळण्याची शक्यता शून्य. माध्यमांना आपले म्हणणे कळवण्याचे तोकडे प्रयत्न. आंतरराष्ट्रीय माध्यमे तर सोडूनच द्या. ह्यांच्या कडे ३७ स्वयंसेवी संघटना ही नसाव्यात. असल्याच तर त्या एकत्र येऊन अशा वार्ताहर परिषदेमध्ये एका सुरात बोलण्याचे भाग्य वेगळे. पक्ष म्हणून केंद्र आणि राज्य पक्षात ताळमेळ राहिला असताच असे नाही. आपल्यावरील आरोपांना उत्तर काय द्यावे कसे द्यावे लोकांना पटेल अशा भाषेत ते कसे शेवटपर्यंत पोचवावे ह्याविषयी पूर्ण काळॊख.

ही विषम परिस्थिती का बरे येते?

आपण सगळे इतिहास शिकलो. पण त्यातून काही शिकलो नाही. असे म्हणतात की ब्रिटिशांकडे कवायती सैन्य होते म्हणून एतद्देशीय राजे त्यांच्याशी युद्ध करताना कमी पडले. तर इथल्या राजांचे सैन्य कसे होते? इथल्या राजांचे सैनिक शांततेच्या काळामध्ये आपापल्या घरी असायचे. आपापल्या उद्योगामध्ये - शेतीमध्ये मग्न! ह्या काळाचा पगार मिळत नसे. युद्धाची चाहूल लागली की राजा प्रथम आपल्या वतनदारांना आपापले सैन्य घेऊन या म्हणून निरोप दे ई - वतनदारांना राजाकडून पैसा मिळाला की तो सैनिक घेऊन हजर होई. ह्या विरुद्ध ब्रिटिशांचे सैन्य कवायती होते. ते फुल टाईम सैनिक होते. ते केवळ लढाईचाच विचार करत आणि त्यासाठी अखंड अविरत तयारी करत. त्यामुळे युद्ध आले म्हटले की त्यांना पूर्वतयारीची गरज नसे.

आज जमाते पुरोगामींकडे अशी कवयती फौज आहे!! गेल्या दोन दिवसामध्ये ते आपल्याला स्पष्टपणे दिसले आहे. कवायती सैन्याकडून चुका होत नाहीत - झाल्या तरी गंभीर चुका होत नाहीत. कारण त्यांना युद्धाचा वेगळा सराव करावा लागत नाही.

हा अनुभव नवा नाही. मोदी शहा दुकलीला तर अजिबात नाही. २००२ पासून आजपर्यंत त्यांना ह्याच परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे ना? मग निदान आता तरी ह्यावरती परिणामकारक योजना हवी असे वाटायला हवे ना?


इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर देखील परिवाराने ह्यातून धडे घेतलेले नाहीत. इथून पुढे घेतले जातील ह्याची शक्यता नाही. प्रश्न माओवादाचा होता आणि असे एकही केंद्र भाजपकडे उपलब्ध नाही जिथे माहिती उपलब्ध असेल आणि माध्यमांसमोर त्यातले काय बोलावे ह्याची गाईडलाईनही उपलब्ध नाही.

साहजिक आहे अशी टीम "फ्लुक" ने जिंकू शकते. पण एखाद्या कारखान्यामधल्या रिफाएन केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही.

जाणवले ते लिहिले. बाकी - ईश्वराच्या हाती ठेवायचे की ह्यामध्ये बदल करायचा? ठरवा काय ते. धन्यवाद.

1 comment:

  1. जानेवारी २०१५ ची फेसबुक पोस्ट होती.
    https://www.facebook.com/anandrajadhyaksha19570621/posts/950993171585147
    त्यानंतर ३ - ४ वेळा तरी पुनर्प्रकाशित केली होती.
    इंद्रेश कुमार यांना ह्याचा प्रिंट काढून दिलं आणि कैक जणांना दिली, आपल्या परीने प्रयत्न करायचे, पुढे नशीब.

    ReplyDelete