गोवा
नवापैकी सात मंत्री पाडणार्या गोव्यातील जनतेचा किती राग भाजप सरकारवर होता हे गोव्यामध्ये पाहायला मिळाले. श्री पर्रिकर उतरले नसते तर मैदानात भाजपचे पानिपत ठरलेले होते. असेही गोव्यामध्ये दोन्ही बाजूंना उन्नीस बीस अशाच जागा मिळत असतात. त्यामुळे निदान खड्डा बुजवण्यात पर्रिकर यशस्वी ठरले म्हणता येईल. पण गोवा निवडणुकीला दोन वेगळे संदर्भ आहेत. एक आहे तो अर्थातच रशियन माफियांचा. त्यांच्या सुळसुळाटाने गोवा राज्य असुरक्षित बनले आहे आणि तिथे कणखर नेतृत्वाची गरज आहे हे उघड आहे.
कसे लिहावे? खरे तर लिहिण्याची इच्छा नाही. गटाराचे तोंड उघडले की घाण तेवढे पसरते आणखी काही नाही. म्हणून काही संदर्भांचा उल्लेख टाळून असे म्हणेन की ल्यूटन्स दिल्लीच्या राजकारणाचे पर्रिकर बळी आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये पंतप्रधान - गृहमंत्री - अर्थमंत्री - परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री हे सुरक्षा समितीचे सदस्य असतात आणि ही प्रतिष्ठेची पदे समजली जातात. ह्या पदांसाठी काही जण इच्छुक आहेत. त्यातल्या काहींची वर्णी लागायची तर तिथल्या काहींना पदे रिकामी करावी लागणे क्रमप्राप्त ठरते. असल्या राजकारणामध्ये पर्रिकर नाहीत. संसारामध्ये असूनही निरिच्छ असणार्या या राजयोग्याचे मन दिल्लीत जाण्याचे नव्हतेच. ज्या चांडाळ चौकडीचा सामना करण्याची मनिषा बाळगून मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाले आणि त्या दिशेने पावले टाकत आहेत ती चांडाळ चौकडी किती शक्तीशाली आहे ह्याचा प्रत्यय ह्या प्रकरणामध्ये आला आहे. गोवा अधिवेशनामध्येच मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु झाली. आणि पर्रिकर मोदींचे समर्थक पहिल्यापासून होते. पण चांडाळ चौकडीच्या कारवायांपुढे सध्यातरी मोदींनी तात्पुरती माघार घेतली आहे असे मी मानते. ती त्रुटी भरून काढण्याचा त्यांनीही काही विचार केला असेल. चांडाळ चौकडीला नकोसे असणार्या मोहर्यांपैकी दुसरा मोहरा बाजूस झाला आहे. मोदी पर्रिकरांना विसरू शकत नाहीत. हे लवकरच समोर येईल.
पर्रिकरांशिवाय मोदी सरकार लंगडे आहे. लंगडे आहे.
...
या वर्षीच्या बीटींग द रिट्रीट समारंभात 29 जानेवारी रोजी श्री पर्रिकर दिल्लीत हजर नव्हते. 26 जानेवारीच्या समारंभाचा अधिकृत सांगता सोहळा असल्याने इथे संरक्षण मंत्री नेहमीच असतात पण पर्रिकर गोव्यात निवडणूक तयारीसाठी परतले होते. तेव्हाच शंका आली होती. असेही South ब्लॉकला मराठी शब्द ऐकायची फारशी सवय नव्हतीच. तिथे आता मराठी - कोकणी निःशब्द झाली आहे.
सोबत: समारंभात राष्ट्रपती येण्यापूर्वीचे एक मिनिट सेनाप्रमुख ज. रावत यांच्याशी बोलताना पंतप्रधान श्री मोदी
No comments:
Post a Comment