Thursday, 14 September 2017

बर्कले भाषणाचे प्रयोजन काय?



आयपीएल - एनजीओ - बनावट नोटा - हवाला - बॉलीवुड - रिअल इस्टेट - म्हणू तसे वाकवता येणारे भ्रष्ट प्रादेशिक पक्ष - परकीय शक्तींची मदत - मीडिया अशा भक्कम खांबांवरती यूपीएने दहा वर्षे हिंदूद्वेषाचा राज्यकारभार केला.

वरच्या प्रत्येक खांबाला आज मोदींनी सुरूंग लावला आहे. चांडाळांच्या टोळीमधले अनेक जण तुरूंगाच्या वाटेवर आणले गेले आहेत. सत्तेबाहेर असूनही काँग्रेसला जनतेची सहानुभूती मिळू शकली नाही. उलट जाळे खेचले जात आहे. फास जसजसा आवळला जातोय तसतसे धीर सुटत चालला आहे. पण मस्ती संपत नाही. अजूनही आपणच भारताचे राजघराणे आहोत आणि जन्मतः पंतप्रधानपद आपलेच आहे असे मनापासून वाटते आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले म्हणजे तथाकथित लिबरल्सचे शक्तिपीठ. कागदावरती हेच लिबरल्स राजघराण्याला विरोध करतात. पण राहुल गांधी यांची दर्पोक्ती त्यांना हवीहवीशी वाटते. असा यांचा भोंदूपणा आहे.

गेल्या चार पाच वर्षात बुद्दू अशी आपली प्रतिमा उभी करण्याचे श्रेय राहुल गांधी यांचे स्वतःचे आहे. आता ही प्रतिमा पुसण्याचा आटापिटा चालू आहे. त्याची सुरूवात बर्कलेपासून करण्यात आली आहे. ह्या विद्यापीठात हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. अशा भारतीय तरूणाईसमोर आपली intellectual अशी प्रतिमा नव्याने उभारण्यासाठी जुन्या मालाला नवीन पॅकेजिंग करण्यात आले आहे.

पण गोष्ट इथेच संपते का?

ज्या शक्ती आज ट्रंप यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे प्रयत्न करत आहेत - त्यांच्यावर महाभियोग चालवला जाईल म्हणून ग्वाही देत आहेत ते हिलरी क्लिंटन यांचे पाठीराखे त्यांची सखी सोनियांच्या मदतीसाठी आपले शस्त्रागार खुले करत आहेत. अमेरिकेत एक अतिशय भारतद्वेष्टी लॉबी कार्यरत आहे. त्याच लॉबीच्या मदतीने मोदी यांना व्हिसा नाकारण्याचा उटपटांग कार्यक्रम चालवला गेला होता. मोदी सत्तेत आल्यावर जून २०१४ मध्ये मुस्लिम - स्त्रिया - दलित भारतामध्ये असुरक्षित असल्याची हाकाटी उठवायचे कारस्थान रचले गेले ते याच लॉबीच्या सहाय्याने. ओबामा भारतभेटीकरता आले असता दिल्या गेलेल्या मेजवानीमध्ये सोनियांना ओबामांचे कान फुंकायची संधी मिळावी म्हणून ओबामां टेबलावर सोनियांची वर्णी लावणाऱ्या परराष्ट्र सचीव सुजाता सिंग असोत की तिकडे ट्रंप यांच्या अडमिनिस्ट्रेशनमध्ये भारतविरोधी 'घातपाती' मनोवृत्तीचे उच्च अधिकारी असोत मोदींची अलर्जी असलेली मंडळी चुपचाप आपली कामे उरकत आहे. गेल्या काही दिवसात UNHRC ने भारताला रोहिंग्या मुस्लिमांच्या समस्येवरून बोधामृत पाजले तिथेही अशीच लॉबी कामाला लावण्यात आली आहे.

हीच लॉबी आजही कार्यरत असून मोदींच्या विरोधात सोनियाजींची सत्ता पुन्हा प्रस्थापित व्हावी या उद्देशाने सोंगट्या खेळल्या जात आहेत. म्हणूनच देशांतर्गत आधाराचे खांब तुम्ही भले हलवाल पण आमचे संरक्षण देशाबाहेर बसले आहे आणि अजूनही भक्कम आहे असा इशारा मोदींना देण्याचा उद्देश लपून राहत नाही.

या आंतरराष्ट्रीय टोळीशीही सामना मोदींनाच द्यायचा आहे. देशांतर्गत खांब खिळखिळे करण्यासाठी मोदींनी काय पणाला लावले आहे ह्याची नोंद इतिहासच करेल. आता फक्त पेशन्स दाखवण्याची गरज आहे.



3 comments:

  1. The big Lobby & their value chain
    wASP>Baptist>Zionist>Jihadi M's>Roman Catholics ...all are enemies of Indus -Himalayian-Hindu-Buddh civilization ..

    पण भारतातील जनतेला कधी कऴणार हे सगळं ...

    ReplyDelete