ख्रिस्तोफर स्टीलचा हिलरी-प्रचारमोहिमेत काय सहभाग होता हे समजले नाही तर मोहिमेचे धागेदोरे आपल्याला समजणार नाहीत. स्टील व्यवसायाने एका माजी ब्रिटिश गुप्तहेर होता. ते काम करत असताना त्याचे कार्यक्षेत्र रशियन विषयात होते. फ्यूजन जीपीएस नामक वॉशिंग्टन डी सी मधील एका कंपनीने त्याला कंत्राटी काम दिले होते. सार्वजनिक रीत्या उपलब्ध असलेल्या प्रकाशित साहित्याचा वापर करून संशोधन करणे आणि धोरणात्मक सल्ला देणे हे काम कंपनी करत असे. वेगवेगळे उद्योग - लॉ फर्म - गुंतवणूकदार - राजकीय पक्ष त्यांचे अशील होते. फ्यूजन जीपीएस कंपनीचे एक ग्राहक होते त्याच शहरातील एक लॉ फर्म. डेमोक्रॅटिक पक्षाची नॅशनल कमिटी आणि हिलरी क्लिंटन ह्यांच्या प्रचारमोहिमेसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून ह्या लॉ फर्मची सेवा घेण्यात आली होती. तेव्हा सामान्यांच्या भाषेत सांगायचे तर स्टील हा हिलरींच्या प्रचार मोहिमेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त झालेला रशियाविषयातील जाणकार माजी ब्रिटिश हेर होता. ट्रम्प ह्यांच्या प्रचारमोहिमेवरती नजर ठेवून त्याच्या रशियन सूत्रांकडून मिळणारी माहिती गोळा करून मोहिमेतील प्रमुखांना देणे हे त्याचे काम होते. ह्या कामासाठी त्याला कंत्राट देण्यात आले होते.
५ जुलै रोजी एकीकडे कोमी वार्ताहर परिषद घेऊन हिलरींवरती गुन्हा दाखल होणार नाही म्हणून घोषणा करत होते त्याच दिवशी स्टील ब्रिटनमधून इटलीच्या रोम शहरामध्ये पोचला होता. जुलै २०१६ - हिलरींच्या प्रचारमोहिमेशी संबंधित काम स्टीलला नुकतेच मिळाले होते. आज "स्टील डोसीयर" म्हणून प्रसिद्ध असलेल्या १७ अहवालांपैकी केवळ एकच अहवाल त्याने ५ जुलैच्या अगोदर म्हणजे २० जूनला कंपनीला दिला होता. त्यामध्ये स्टीलने ट्रम्प ह्यांचे वर्णन "पुतीन ह्यांचा मंचुरियन कँडिडेट" असे केले होते. ( The Manchurian Candidate नावाची एक सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरी आहे. हिच्या कथानकांमध्ये एका गर्भश्रीमंत अमेरिकन व्यक्तीच्या मुलाला रशिया ब्रेनवॉश करून खुनी बनवते अशी पार्श्वभूमी आहे) ट्रम्प ह्यांना "पुतीन पुरस्कृत मांचुरिअयन कॅन्डीडेट" असे संबोधून स्टीलने सर्वाना धक्का दिला होता. "गेली किमान पाच वर्षे पुतीन सरकारने ट्रम्प ह्यांना पाठिंबा दिला आहे आणि मदत केली आहे. अमेरिकेमध्ये गोंधळ उडवून देणे आणि फाटाफूट करणे हे पुतीन सरकारचे उद्दिष्ट आहे. खास करून अमेरिका युरोप ह्यांच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचे रशियन सरकारचे बेत आहेत. हिलरी क्लिंटन ह्यांच्याविषयी गोपनीय माहिती ट्रम्प ह्यांना पुरवण्याचे काम रशियन सरकार करत आहे" असे स्टीलने लिहिले होते.
"ट्रम्प ह्यांना आपल्या कह्यात घेण्यासाठी पुतीन ह्यांनी त्यांना बिझिनेस डील्स देऊ केली होती. पण ट्रम्प ह्यांनी ती नाकारली. त्यानंतर ट्रम्प ह्यांचे कामजीवन ह्यावर रशियाने लक्ष केंद्रित केले. २०१३ मधल्या एका रशिया दौर्यावरती ट्रम्प काही महिलांसोबत हॉटेलमध्ये राहत होते. ओबामा ज्या स्वीटमध्ये राहिले तोच स्वीट ट्रम्प ह्यांनी आग्रहाने बुक केला होता. त्यावेळच्या फिल्म्स रशियाकडे आहेत. ह्याचाच अर्थ व्लादिमिर पुतीन ट्रम्प ह्यांना ब्लॅकमेल करत आहे हो!!" - स्टीलचा सनसनाटी अहवाल बघताच त्याच्या संपर्कात असलेल्या एफबीआय अधिकाऱ्याने तो अहवाल तातडीने मुख्यालयात पाठवला आणि तिथून तो विनाविलंब अध्यक्ष ओबामा ह्यांनाही मिळाला असेल असे तुम्ही गृहीत धराल. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. हा अहवाल स्ट्रेझॉकच्या हाती पोचायला काही आठवडे गेले. कारण? स्टीलने आपला अहवाल ज्या एफबीआय अधिकाऱ्याकडे सोपवला होता तो अधिकारी अनुभवी होता. सूत्रांनी माहिती दिली म्हणून तशीच्या तशी स्वीकारायची नसते ही नेहमीची पद्धत असते. त्याने फारसा गाजावाजा न करता ही माहिती मुख्यालयात पाठवली. ती माईक मॉरेल ह्यांच्याकडे गेली. मॉरेलने प्रथम स्टील कितपत विश्वसनीय आहे ह्याची चौकशी केली. ह्यामध्ये असे निष्पन्न झाले की स्टील ज्यांना "स्वतःची" सूत्रे म्हणून म्हणत होता त्या रशियन सूत्रांच्या तो थेट संपर्कात नव्हता. ही सूत्रे म्हणजे रशियन गुप्तहेर खात्यातील अधिकारी होते. स्टील काही लोकांना पैसे देत असे - मग ह्या व्यक्ती रशियन गुप्तहेर खात्यातील लोकांशी संपर्क साधून त्यांना पैसे देऊन माहिती मिळवत असत असे दिसून आले. ह्याचाच अर्थ स्टीलचा अहवाल तसाच्यातसा स्वीकारता येण्यासारखा नव्हता. माहिती जर रशियन गुप्तहेर खात्यातील व्यक्तींकडून येत असेल तर त्यामध्ये सत्य - थापा आणि अफवांचे बेमालूम मिश्रण असू शकते हे अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तीला माहिती असायला हवे. तसे ते ब्रिटिश हेर खात्यामध्ये काम करणाऱ्या स्टीलला का माहिती नव्हते ह्याला उत्तर मिळाले नाही. एक तर स्टील खेळवला जात होता किंवा अशा प्रकारच्या खेळामध्ये तो सहभागी होता. स्टीलचा अहवाल टोपलीत टाकण्याच्या लायकीचा होता हे अनुमान मॉरेलने काढले. मॉरेल हिलरींचा खदा समर्थक होता. असे असूनही एक व्यावसायिक एफबीआय अधिकारी म्हणून त्याने काढलेला निष्कर्ष महत्वाचा होता. रोममधील एफबीआय अधिकाऱ्याने काढलेला निष्कर्ष आणि मॉरेलचा निष्कर्ष मिळताजुळता होता. मॉरेलने हा अहवाल कुचकामी ठरवण्याचे सगळेच निकष बाहेर येऊ दिलेले नाहीत. ते एक एफबीआय गुपित म्हटले पाहिजे. पण बाहेर आली त्यापेक्षा कितीतरी अधिक माहिती त्याच्याकडे होती निश्चित. स्टीलच्या अहवालावरती घेण्यासारखा एक आक्षेप म्हणजे - जे रशियन अधिकारी ही माहिती पुरवत होते ते खरोखरच निवृत्त होते की आताही सेवेत होते? ह्या प्रश्नाच्या उत्तरावरती अनेक गोष्टी अवलंबून होत्या. हे ताडून पाहण्याचे स्टीलकडे कोणते मार्ग होते सांगता येत नाही.
स्टीलचे अहवाल क्लिंटन ह्यांच्या प्रचारमोहिमेत अगदी फिट बसत होते. २ जून रोजी हिलरी ह्यांनी ट्रम्प ह्यांच्यावर टीकेचे मोहोळ उठवत म्हटले होते की ट्रम्प ह्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या कल्पना धोक्याच्या आहेत. त्यांची मते म्हणजे खरोखर विचारपूर्वक काढलेले निष्कर्ष वाटत नाहीत. कधीतरी वैयक्तिक हेव्यादाव्यातून केलेली विधाने - तर कधी वैतागाने उदगारलेले बोल आणि कधीतरी सपशेल थापा असे ट्रम्प ह्यांच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप आहे असे हिलरी म्हणत होत्या. हिलरी असेही म्हणाल्या की "रशियातील सर्वेसर्वा व्लादिमिर पुतीन ह्यांच्या विषयीचे ट्रम्प ह्यांचे विचार तर गूढ आहेत. पुतीन हे उच्च दर्जाचे नेते असल्याचे त्यांचे मत ऐकून तर मला वाटले की हुकूमशहाला उत्तम नेता म्हणणाऱ्या ह्या व्यक्तीचेच मूल्यमापन मनोवैज्ञानिकांनी करावे." अशा झोम्बणाऱ्या शब्दातील टीका करणाऱ्या हिलरी अध्यक्षीय निवडणुकीच्या गदारोळात ट्रम्प ह्यांचे मूल्यमापन कोणा मनोवैज्ञानिकावर सोडतील हे शक्य नव्हते. त्यांनी तेवढ्यासाठीच स्टील नामक "यशस्वी" हेर नेमला होता. नेमणूक झाली तेव्हाच स्टीलने त्यांना सांगितले होते की रशिया ट्रम्प ह्यांना ब्लॅकमेल करत आहे. आपल्या मनासारखे सांगणारा हा हेर प्रचारयंत्रणेला आवडला असावा. ह्या भेटीनंतर स्टील रोम येथे गेला होता. तेथील "आपल्या हॅन्डलर" एफबीआय अधिकाऱ्याला त्याने काही माहिती दिली. ही भेट झाली तेव्हा स्टीलला हिलरी ह्यांच्या प्रचारयंत्रणेने पैसे देऊन बुक केले आहे हे त्या एफबीआय अधिकाऱ्याला माहिती असणे शक्य नव्हते. म्हणून आलेल्या माहितीकडे तो स्वतंत्र बातमी म्हणून पाहत होता.
स्टील रोममध्ये एफबीआय अधिकाऱ्याला भेटला त्याच दरम्यान एफबीआय कडे दुसऱ्या एका सूत्रांकडून महत्वाची बातमी आली होती. ट्रम्प म्हणजे रशियन हुकूमशहा पुतीन ह्यांच्या हातातले बाहुले आहे हे सत्य लोकांच्या मनावर ठसवण्याचा निर्णय हिलरी ह्यांच्या गटाने घेतला होता ही बातमी मोठी होती. ती स्टील कडून आलेली नव्हती. एफबीआय वर्तुळामध्ये ती पसरली तेव्हा तिथे एक भारलेले वातावरण तयार झाले. ईमेल्स प्रकरणाच्या कमी लावण्यात आलेले पेज आणि स्ट्रॅझॉक तर खुश झाले. त्यांना दोघांनाही ट्रम्प नकोच होता. पण मॅक केब ला सुद्धा तो नको होता. ह्या माहितीवरती तात्काळ कारवाई न करण्याचे ठरले. स्टील आता सांगत होता की "ट्रम्प ह्यांचे व्हिडिओ गुप्तच ठेवण्याचे रशियाने ठरवले आहे. ट्रम्प रशियाला फारच उपयुक्त ठरत आहेत. पुतीन आणि ट्रम्प दोघांनाही हिलरी जिंकायला नको होती. ह्या एकमतावरती आधारित दोघांच्यात "तह" झाला होता. पुतिनने ट्रम्प ह्यांना निवडणूक जिंकण्यास मदत करावी आणि बदल्यात ट्रम्प ह्यांनी युक्रेन आणि ने टो च्या संरक्षणात रशियाला ढील द्यावी. मामला दोघांच्या पथ्यावर पडणारा दिसत होता." स्टीलकडे पुतीनच्या सान्निध्यात असलेले खबरे होते तसेच ट्रम्प ह्यांच्या संपर्कातले खबरेही होते. रशियन वंशाच्या एका ट्रम्प च्या निकटवर्तीयाने स्टीलला सांगितले होते की "पुतीन आणि ट्रम्प ह्यांच्यामध्ये आता उत्तम सामंजस्य तयार झाले आहे. डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या ईमेल्स चोरायचे काम रशिया करणार आहे ही बाब ट्रम्प ह्यांच्या संमतीने आणि त्यांना अंधारात न ठेवता करण्यात आली आहे असे स्टील ची सूत्रे सांगत होती". DNC च्या ईमेल्स चोरीच्या मामल्यात ट्रम्प पहिल्यापासून भागीदार होता हे स्टील ह्याचे म्हणणे हिलरी गटाला "बायबलमधील सत्य" वाटू लागले होते.
इतके झाल्यानंतर स्टील ला ज्या कंपनीने नियुक्त केले होते ती फ्यूजन जीपीएस कंपनी त्याचे अहवाल कशा तऱ्हेने वापरात होती?
(अपूर्ण)
No comments:
Post a Comment