Some day or the other, taking disadvantage of the weakening fabric of our democracy, some unscrupulous intelligence men may gang up with ambitious Army Brass and change the political texture of the nation and give IB the colours of ISI of Pakistan. That will be the most unfortunate day for Indian democracy. India cannot afford to suffer that indignity from which most of the post-colonial regimes in Asia and Africa are suffering.
- एक वेळ अशी येऊ शकते जेव्हा भारतीय लोकशाही कमकुवत असेल - काही तत्वशून्य (धटिंगण) सुरक्षा अधिकारी आणि महत्वाकांक्षी सैनिकी अधिकारी गटबाजी करून देशाची राजकीय व्यवस्थाच बदलून टाकण्याचा कट करतील आणि तो प्रत्यक्षात उतरवतील. भारतीय लोकशाहीसाठी हा अत्यंत दुर्दैवी दिवस ठरेल. आफ्रिका आणि आशियातील वसाहती राजवटीतून काही नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांच्या नशिबी आलेले असे दुर्भाग्य आणि अपमानास्पद अवस्था भारताच्या कपाळी दिसेल.
हे विधान आहे आयबीचे कर्तबगार अधिकारी श्री मलोय कृष्ण धार ह्यांचे - त्यांच्या "Open Secrets - India's Intelligence Unveiled" मधून घेतले आहे. हे विधान आज आठवण्याचे निमित्त आहे ते अर्थातच आलोक वर्मा वि. अस्थाना ह्या दोन सीबीआय अधिकार्यांनी चालवलेल्या एकमेकांविरुद्धच्या कारवायांचे. ह्या दोघांमधील भांडण वैयक्तिक आहे की तत्वाधारित ते अजून जनतेसमोर सिद्ध व्हायचे आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये श्री आलोक वर्मा ह्यांना स्वतःच्याच कार्यालयामध्ये अस्थाना ह्यांच्या एका सहाय्यक अधिकार्यावर धाड घालावी लागली - प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयावरच धाड घालण्याचे षड् यंत्र रचावे लागले हे जनतेसमोर यायचे आहे. दोन गट आणि त्यांचे राजकीय समर्थक थेट दुसर्या गटावरती संघटित गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याचे आणि फरार गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे आरोप होत आहेत हेही सामान्य लोकांसाठी एक गौडबंगाल आहे.
धार ह्यांनी तर अगदी स्पष्ट इशारा दिलेला नाही काय? इथे एका गटामधले अधिकारी दुसर्या गटातील राजकीय नेतृत्वाला धाब्यावर बसवून आपल्या गटाच्या राजकीय नेतृत्वाला अपेक्षित आहेत व त्यांना फायद्याच्या ठरतील अशा कारवाया सर्व नियम डावलून करताना दिसत नाहीत काय? काही तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे ह्यामध्ये केवळ सीबीआय मधले अधिकारी गटबाजी करत नसून अन्य सुरक्षा यंत्रणांमधले अधिकारीही त्यांना मदत करत आहेत असे चित्र आहे. तज्ञांनी तर असेही म्हाटले आहे की काही विदेशी गुप्तचर संस्था अधिकार्यांच्या एका गटाला मदत करत करत असण्याची शक्यता आहे. आज जरी एखाद्या आजी माजी सैनिकी अधिकार्याचे नाव पुढे आलेले नसले तरी नजिकच्या भविष्यामध्ये तसे होणारच नाही ह्याची काहीही शाश्वती उरलेली नाही. ह्या ना त्या कारणाने निवृत्त अधिकारी राजकीय मुद्यांवरती तसेच धोरणावरती अगदी अश्लाघ्य टीका टिप्पणी करताना दिसत नाहीत काय? अनेक कारणांमुळे सैन्यामध्येही नाराजी आहेच, ह्या सर्व उद्रेकाचे रूपांतर कशात होईल हे कसे सांगता येईल? परिस्थिती जसे वळण घेईल तसतसे घटक पुढे येत जातात. म्हणून विविध बाबतीमध्ये सुरक्षा यंत्रणांशी व्यवहार करण्याचा विस्तृत अनुभव असलेल्या धार ह्यांनी दिलेला इशारा गंभीर मानला पाहिजे.
लोकसभा निवडणुकांमध्ये अमेरिकन निवडणुकीप्रमाणे परदेशाचा हस्तक्षेप असेल काय ही शक्यता सामान्य जनतेला हलवून टाकत आहे या पार्श्वभूमीवरती येत्या काही दिवसात तीन राज्यातील निवडणुका आणि काही महिन्यांमध्ये देशाच्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असताना आणि कायदा आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत असण्याची गरज असताना जर सुरक्षा यंत्रणा अशा गटबाजीत अडकलेल्या बघायला मिळत असतील तर लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयास असेच ह्या बंडाचे रूप होत नाही काय?
पुस्तकामधले काही उतारे इथे क्रमवार आहेत तसे इंग्रजीमध्ये देत आहे.
विचार करा. पटते का? पटत असेल तर इतरांना पटवा.
भारतीय लष्करामध्ये काही अधिकाऱ्यांचा गट मोदींविषयी आणि संघाविषयी अत्यंत विषारी प्रचार करत असून त्यामुळे लष्करातील अधिकारी हे अत्यंत नाराज झालेले आहेत हे काही फार चांगले लक्षण नव्हे
ReplyDeleteYes I agree
Deleteमाझं मत जरा विचित्र वाटेल पण जर जानेवारीला भारतीय लष्कराने एखादे मर्यादित कालावधीसाठी पाकिस्तान बरोबर युद्ध केले तर हे छोटे मोठे गृहकलह मागे पडतील आणि देश ही भावना मोठी होईल. अर्थात मी काही स्वाती मॅडम सारखा अभ्यासू नाहीये
ReplyDeleteMay not be easy as it has international repurcussions
Deleteपुढचा भाग कधी?
ReplyDelete