त्रावणकोर संस्थानाची सूत्रे जेव्हा ब्रिटीशांनी राजाकडून हाती घेतली तेव्हा शबरीमला तसेच अन्य देवस्थानांची देखभाल करण्याची जबाबदारीही स्वीकारण्यात आली होती. हिंदू देवळांच्या व्यवस्थापद्धतीनुसार प्रत्येक देवळाला स्वतंत्र भूमी देण्यात आली होती असे दिसून येते. त्याच्या उत्पन्नामधून देवळाचा खर्च चालवण्याची प्रथा होती. शिवाय तेथील स्थानिक राजा आपल्या खजिन्यातून खर्च चालवण्यास हातभार लावत असे. ब्रिटिशांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांनी देवस्थानाची जमीन सरकारी ताब्यात घेतली व बदल्यामध्ये देवस्थानाचा खर्च चालवण्याची जबाबदारी घेतली. आज सहा कोटी भक्त देवळामध्ये येतात त्यांच्याकडून सरकारला किमान १०००० कोटी रुपयाचे उत्पन्न आहे असे दिसते. ह्यामधला पैसा यात्रेकरूंच्या सोयीसाठी वापरला जात नाही. देवस्थानाला साडेसहा कोटी रुपये खर्चून आसपासची ११० एकर जमीन घ्यावी लागली तर निलक्कल येथील चर्चला परवानगी देण्यात आल्यावर वर्षाला शंभर रुपयाच्या भाड्यावरती ५८ एकर जमीन केरळ सरकारने दिली आहे. शबरीमला देवळात जाण्यापूर्वी भक्त मंडळी निलक्कल गावी पंपा नदीमध्ये स्नान करतात. आज नदीच्या पाण्यातील प्रदूषण धोकादायक झाले आहे. पण त्याच्या स्वच्छतेसाठी देवस्थानमने काहीही स्वारस्य दाखवलेले नाही. मकर विलक्कु समयी भक्तगण जो पैसा देवस्थानमला देतात त्यातून केरळ सरकार देवस्थानमकडून लाखो रुपये वसूल करते. परंतु मुस्लिम अथवा ख्रिश्चन सणांसाठी सरकार आपल्या तिजोरीतून खर्च करते. शबरीमला येथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी देवस्थानमला वर्षाकाठी पन्नास लाख रुपये मोजावे लागतात. वैद्यकीय सुविधांसाठी देवस्थानम ५५ लाख रुपये भरते. शबरीमलाला वीज पुरवली जाते ती अवाच्या सवा भावाने. आणि ती मिळण्यासाठी देवस्थानमला एक कोटी ऐंशी लाख रुपये आगाऊ रक्कमेचा भरणा करावा लागतो. जिल्हाधिकार्याला साफसफाईसाठी २५ लाख रुपये द्यावे लागतात. शबरीमला देवळाकडे जाणार्या रस्त्यांच्या बांधणीचे काम BOT पद्धतीने देण्यात आले आहे. त्यामुळे कंत्राटदार भक्तांकडून दसपट पैसे वसूल करतात. शबरीमला आणि गुरूवायूर देवळांना जिहादी तत्वाकडून धोका आहे. शबरीमला श्री कोविल येथे दोन वर्षांपूर्वी स्फोटके सापडली होती. जिथे भक्तांसाठी प्रसाद बनवला जातो तिथे आगीचे प्रकार घडले आहेत. प्रसादामध्ये पाली आढळल्या आहेत. शबरीमलाच्या रर्स्त्यावरती आजवर अनेकदा चेंगराचेंगरी होऊन माणसे मारली गेली आहेत. ह्यामागे घातपात नाहीच असे म्हणता येत नाही. श्री. लालकृष्ण अडवाणी ह्याच्या सभेमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाच्या केसमध्ये पोलिसांनी दोघांना शबरीमला येथून अटक केली होती. ह्या घटना अतिशय बोलक्या आहेत. जिहादी तत्वांकडून शबरीमलाला धोका असल्यामुळे सरकार अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवते पण सुरक्षेसाठी पैसा सरकार खर्चत नाही तोही जास्तीचा ७५ लाख रुपयाचा भुर्दंड देवस्थानमला सोसावा लागतो. सरकारने देवस्थानमवरती लादलेला हा खर्च अर्थातच भक्तांकडून वसूल केला जातो.
सरकारचे नियंत्रण देवस्वम बोर्डावरती असल्यामुळे त्याच्यावर कोणाला नेमायचे हा निर्णयही सरकार घेते. गेली कित्येक वर्षे ह्या पदांवरती अश्रद्ध सीपीएम सदस्यांची नियुक्ती झालेली दिसते. आळापुल्हा गावातील सीपीएम सेक्रेटरी वल्लीकुन्नम तसेच हिंदू द्वेष्टे सुधाकरन ह्यांची नियुक्ती अशीच आहे. आता तर प्रमुख पुजारी म्हणून सीपीएम सदस्याची नियुक्ती करण्याचा घाट कम्युनिस्ट सरकारने घातला आहे. शिवाय अशा पद्धतीने नेमण्यात आलेले बोर्ड भ्रष्टाचारात बुडलेले आहे हे सांगायला नको.
श्रीमती इंदिराजींच्या हयातीमध्ये कन्याकुमारी येथील समुद्रामधील एका बेटावरती ख्रिश्चनांनी दावा केल्याचे सर्वांना आठवत असेल. त्याकाळी अमेरिकन्स अशा तळाचा वापर दिएगो गार्शियाप्रमाणे करतील ही सार्थ भीती होती. त्यामुळे हे बेट त्यांना न देता इंदिराजींनी रा. स्व. संघाच्या श्री एकनाथ रानडे ह्यांच्या हाती सुपूर्द करून तिथे विवेकानंद स्मारक बनवण्यास परवानगी दिली होती. इतकेच नव्हे तर ऐन आणिबाणीमध्ये श्री रानडे ह्यांना अटक होऊ दिली नाही व कार्य सुरू ठेवा असा निरोप देण्यात आला होता. पण बाईंच्या स्नुषांना धर्मांतराच्या स्वप्नाने पछाडले आहे. मोहनारू ह्यांचे अपहरण प्रकरणामध्ये सनी वार्के हे नाव घेतले जात होते. हेच ते सनी वार्के जे दुबईत राहत असत - ह्या ख्रिश्चनास हाताशी धरून अटलजींच्या मंत्रीमंडळातील संरक्षण मंत्री श्री जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या विरोधात टेहलका कांड रचले गेले होते. ह्याच सनी साहेबांनी दुबईमधील सुनंदा पुष्कर हिची ओळख आज राहुल गांधी ह्यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून ओळखले जाणारे शशी तरूर ह्यांच्याशी करून दिली होती असे म्हणतात. सनी साहेबांना त्यांच्या "भरीव" कामगिरीसाठी सोनियाजींच्या कॉंग्रेस सरकारने पद्मश्री बहाल केली होती हे तर कोणाच्या आठवणीतही नसेल. व्हॅटिकनचे षड् यंत्र केरळपुरतेच मर्यादित नसून आंध्रच्या लोकांना तिरुपतीच्या निमित्ताने असेच अनुभव आलेले नाहीत काय? तिरुमल तिरुपति देवस्थानमच्या अध्यक्षपदावरती ख्रिश्चन वाय एस आर रेड्डी ह्यांच्या सावत्र भावाची नेमणूक करण्यात आली होती आणि देवस्थानमचे पैसे रेड्डी महाशयांनी स्वतःच्या कामासाठी वापरले होते. पुढे देवस्थानमच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसने एका दारूविक्रेत्याची नेमणूक करून राजकीय फायदा उकळला होता. ह्या खेरीज ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये पारपारिक पूजेमध्ये मग्न असलेल्या शंकराचार्यांना तुरूंगात डांबण्याची केस असो की नित्यानंद वा प्रेमानंद ह्यांच्यावरील कारवाई - अगदी इसरोच्या अधिकार्यांवर घालण्यात आलेली बनावट हेरगिरीची केस असो - सर्वांच्या मागे कोणते षड् यंत्र आहे? काही दशकांपूर्वी केरळच्या एका हॉटेलमध्ये अचानक मृत्यूमुखी पडलेले विक्रम साराभाई तरी आज कोणाला आठवतात? हे गौडबंगाल लोकांना कळायला नको काय? .
ह्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जी अस्थिरता उत्पन्न झाली त्यात भर म्हणून शबरीमलाकडे पेरियार धरणाकडून येणार्या रस्त्यावरती निदर्शने करण्यात आली आणि तो रस्ता अडवण्यात आला होता हा योगायोग मानायचा काय? अशा पार्श्वभूमीवरती जनक्षोभाचा स्फोट झाला नसता तरच नवल. दुर्दैव असे की जनतेच्या मनातील संतापाला संघटित करण्यासाठी कोणी पुढे येत नाही बघून देवस्थानमचे माजी अध्यक्ष श्री प्रयार गोपालकृष्णन ह्यांनी नायर सर्व्हिस सोसायटी (एनएसएस) च्या कारयोगम ह्या युनिटस् ना सोबत घेऊन गावागावातील महिलांना संघटीत करण्याचे प्रयत्न केले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एखाद्या तालुकाच्या गावीदेखील लाख लाख महिलांचे मोर्चे निघाले. पण तरीदेखील सरकारला जाग आली नाही. अहिंदू महिलांना देवळापर्यंत घेऊन जाण्याचा उद्योग करणारे अहिंदू पोलिस अधिकारी दुसरीकडे अत्यंत शांतपणे भजने करीत बसलेल्या जनतेवर अमानुषपणे तुटून पडलेले जनतेने बघितले. माध्यमांनी ह्या घटना लपवल्या तरी सोशल मीडियावरती कित्येक व्हिडियो लोकांनी टाकले. आणि असंतोषाचा विस्फोट झाला. ह्याला उत्तर म्हणून ट्विटर व फेसबुकामध्ये अनेक खाती काही काळापुरती बंद ठेवण्यात आली. इतके रामायण झाल्यावरती केरळच्या राज्यपालांनी पुढाकार घेऊन पोलिसांना खडसावल्याच्या बातम्या येत आहेत. पण ना पोलिस ना राज्य सरकार ना केंद्र सरकार ना कोणते पक्ष केवळ आणि केवळ केरळच्या सामान्य जनतेने हे संकट आपल्या छातीवरती झेलले आहे. त्यांच्या समर्थनार्थ देशातील हिंदू जनता काय करणार आहे हा प्रश्न आहे.
आमच्या देशामधील मेकॉले शिक्षण पद्धतीमध्ये तयार करण्यात आलेल्या सुशिक्षित हिंदूंना आपल्या धर्मातील अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरा अंगावर पाल पडल्यासारख्या बोचत असतात. त्यांच्या मनामध्ये आपण हिंदू असल्याचा न्यूनगंड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीने निर्माण करण्यात आला आहे. असे हिंदूच आपल्या नैरश्यापोटी आपण कोणाला मदत करत आहोत ह्याचा तिळमात्र विचार न करता पुस्तकी ज्ञान पाजळतात. कोटीकोटी जनतेच्या श्रद्धास्थानाला हात घालण्यात काय चुकीचे आहे हेही विसरून गेले आहेत. आगरकर असोत की कर्वे - शाहू महाराज वा फुले. त्यांनी हाती घेतलेल्या सुधारणांच्या मागे राजकीय हेतू होते असे म्हणता येणार नाही. पण आज हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचे श्रेय मिरवणारे राजकीय महत्वाकांक्षेने पछाडलेले आहेत हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. असल्या सुधारणांना पाठिंबा देऊन आपण त्या मांडणार्यांचे राजकीय हेतू सफल करण्याचे पाप करत असतो याचेही भान सुशिक्षित हिंदूंना उरत नाही.
सती प्रथा - स्त्री शिक्षण - स्त्रियांनी अर्थार्जनात स्वयंपूर्ण होणे वा अशा प्रकारच्या सुधारणा ह्या लौकिक सुखाशी निगडित आहेत आणि त्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही. पण जे अध्यात्म व त्याचे अस्तित्व आणि प्रयोजनच सुशिक्षित हिंदू नाकारतात त्या आध्यात्मिक आनंदामध्येही लुडबूड आपण का करत आहोत ह्याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. असो. ह्यालाच म्हणतात आयव्हरी टॉवर्स. त्यांना धुडकावून सामान्य जनता धर्मो रक्षति रक्षितः उक्ती सिद्ध करण्यासाठी जिवाची बाजी लावून "रणांगणात" उतरली तेव्हा राजकीय नेतॄत्वाला जाग आलेली दिसते. केरळमध्ये कित्येक कम्युनिस्ट सभासदांनी आपली कार्डे पक्ष कार्यालयामध्ये फेकून दिल्याचे लोक सांगत आहेत. सामान्य हिंदूंना डिवचण्याच्या नादामध्ये केरळची सीपीएम आणि कॉंग्रेस आपली विश्वासार्हताच हरवून बसले आहेत. ह्याचा राजकीय परिणाम म्हाणजे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची सुवर्णसंधी ह्या शपथेवर भाजपचा विरोध करणार्या विरोधकांनीच भाजपला चांदीच्या ताटात बहाल केली आहे.
काही दिवसांपूर्वी शबरीमला म्हणजे दक्षिणेकडील अयोध्याक्षण आहे असे मी लिहिले होते. पण बाबरीमागे निदान अहिंदूंचे खतरनाक कारस्थान नव्हते.आज केरळमधील सामान्य हिंदूंवरती ह्या कारस्थानाला एकाकी तोंड देण्याची पाळी आली आहे आणि हे संकट समोर ठाकताच हा पराक्रमी हिंदू शेपट्या घालून घरामध्ये बसला नाही ह्याचा प्रत्येक हिंदूला स्वाभिमान वाटला पाहिजे. आज केरळ जात्यात आहे. तुम्ही तुमचे राज्य आणि तुमचे देव सुपात आहेत. ही सत्वपरीक्षा तुमच्याही माथी येणार आहे - स्वतःला ठार मारूनही तुम्हाला ठार मारण्याची मनीषा बाळगणार्या जिहादी शत्रूंशी तुमचा सामना आहे हे क्षणभरही विसरता येत नाही. तसे कराल तर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत.
आपले सर्व विचार पटले ताई फक्त महात्मा फुले या माणसाबाबत आपण पुन्हा एकदा थोडासा अभ्यास करावा कारण महात्मा फुले हा या भारत तोडो आंदोलनातला आद्य प्यादा होता
ReplyDeleteखरे आहे, त्यांचे सर्वच तपशील आणि प्रेरणा आवडणारे नाहीत.
Deleteफुलेंनी मारुतीवर पुणे कोर्टात खटला दाखल केला होता
Deleteअगदी बरोबर !
ReplyDeleteअनेक बाबी पटल्या तुमच्या पण द्रविड़ चळवळीची निर्मिती कारण, हिन्दू जातीयभेदमुळे स्वतः एक समाज म्हणून कमकुवत होत गेला त्यामुळे अश्या सामजिक विकृत व्यक्तिना , संस्थाना स्वतःचा डाव साधयला मिळाला हे हि तितकेच सत्य तुह्मी या प्रकारणाच्या मुळशी आहे हे पण नमूद केले असते तर अधिक पटले असते.
ReplyDeleteThese are only partial reasons
Deleteअनेक बाबी मला अगोदर माहीत नव्हत्या, हा लेख वाचल्यावर पटल्या आहेत. "मुस्लिम अथवा ख्रिश्चन सणांसाठी सरकार आपल्या तिजोरीतून खर्च करते." या वाक्याला RTI मार्फत काही लेखी संदर्भ देता येतील का?
ReplyDeleteRef are available on internet
Deleteखाडकन डोळे ऊघडायला लावणारा लेख. . . .
ReplyDeleteदोन्ही लेखनासाठी खूप आभार.. माझ्यासारख्या व्यक्तीला तर हे प्रकरण नक्की काय चालू आहे याचा अंदाजच लागत नव्हता.. त्यामागच्या भीषणतेची जाणीव करून दिल्याबद्दल खूप आभार..!
ReplyDeleteशबरीमला च्या निमित्ताने अहिंदूंनी बरेच रान उठवायचा प्रयत्न केला, भरीस भर म्हणून अहिंदू स्त्रिया त्यामंध्ये आघाडीवर ठेवल्या होत्या महाराष्ट्रामधील देसाई ताई त्यासाठी फेमस आहेत
ReplyDelete